भाजप नेते सलीम जहाँगीर यांचे आवाहन
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : राज्य सरकारने प्रथमच अठरा हजार पदांची पोलीस भरती प्रक्रिया सुरू केली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच ही भरती होत असल्याने सुशिक्षित बेरोजगारांनी ऑनलाइन अर्ज दाखल करून त्यामध्ये सहभागी व्हावे. त्याचबरोबर खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी ईडब्ल्यूएस प्रमाणपत्रासह अर्ज भरावे असे आवाहन भाजप नेते सलीम जहाँगीर यांनी केले आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी खुल्या प्रवर्गासाठी ईडब्ल्यूएस दहा टक्के आरक्षण जाहीर केलेले आहे. सर्वोच्च न्यायालयानेही या आरक्षणावर शिक्कामोर्तब केलेले आहे. सध्या राज्य सरकारने 18000 पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया सुरू केलेली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आलेले आहेत. अर्ज भरण्यासाठी 15 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्याचा फायदा जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगारांनी घ्यावा.
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी ईडब्ल्यूएस दहा टक्के आरक्षणाचे प्रमाणपत्र काढूनच पोलीस भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरावेत. ईडब्ल्यूएस दहा टक्के आरक्षणाचा खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना नक्कीच फायदा होणार आहे. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी मैदानी चाचणीच्या तयारीसह लेखी परीक्षेची अभ्यास करून या भरती प्रक्रियेचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजप नेते सलीम जहाँगीर यांनी केले आहे.
