खेळाडू, क्रीडाप्रेमींचा सहभाग
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात होणा-या राज्य क्रीडा महोत्सवाचा पाश्वभुमीवर येत्या ३० नोव्हेंबर ते ३ डिसेंबर दरम्यान तुळजापूर ते औरंगाबाद या दरम्यान ’मशाल रॅली’ क्रीडा ज्योत चे आयोजन करण्यात आले आहे. मा.कुलगरु डॉ.प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली तुळजापूर येथी तुळजाभवानीच्या मंदिराच्या गाभाऱ्यातून क्रीडा महोत्सवाची ज्योत प्रज्वलित करून मशाल रॅलीस मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. ही रॅली चार जिल्हयातून जल्लोषात ही रॅली औरंगाबादेत पोहचणार असून आज मशाल रॅलीचे बीड जिल्हयात उत्साहात स्वागत करण्यात आले.

३ ते ७ डिसेंबर दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आयोजित २४ वा महाराष्ट्र राज्य क्रीडा महोत्सव स्पर्धेच्या आज आई तुळजाभवानीच्या मंदिरातून बुधवारी सकाळी मशाल प्रज्वलित करून मशाल रॅलीस प्रारंभ झाला. मशाल रॅलीचे समन्वयक डॉ. संदीप जगताप, डॉ. पांडुरंग रणमाळ, डॉ. भुजंग डावकर, गणेश जाधव, कृष्णा फले, जावेद शेख आदींसह विविध महाविद्यालयातील खेळाडू व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्य क्रीडा महोत्सव स्पर्धेच्या आज मशाल रॅलीचे आगमन सकाळी ८ वाजता वाजता बीड शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी बीडच्या जिल्हा क्रीडा अधिकारी सुहासिनी देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे, प्राचार्य डॉ. सविता शेटे, प्राचार्य डॉ. शिवानंद क्षीरसागर, डॉ.विश्वास कदम, मिलीया डॉ. एस. हुसैनी, तसेच बीड जिल्ह्याचे मशाल प्रमुख डॉ. सय्यद हनीफ, डॉ. भालचंद्र सानप, डॉ. जगन्नाथ दत्तापूर, डॉ. शंकर धांडे, डॉ. बाळासाहेब सरपाते, डॉ. संतोष वनगुजरे, डॉ. ज्योती गायकवाड, डॉ. कृष्णा जाधव, डॉ. छत्रपती वैरागर, डॉ. प्रवीण शिलेदार व बीड जिल्ह्यातील विविध महाविद्यालयाचे क्रीडा संचालक, तसेच विद्यापीठ मशाल रॅलीचे डॉ. संदीप जगताप, डॉ. भुजंग डावकर, डॉ. पांडुरंग रणमाळ गणेश जाधव कृष्णा भले व जावेद शेख उपस्थिती होती.
३ ते ७ डिसेंबर दरम्यान राज्य क्रीडा महोत्सव रंगणार
विद्यापीठाच्या क्रीडांगणावर ३ ते ७ डिसेंबर दरम्यान राज्य क्रीडा महोत्सव रंगणार आहे. राज्याच्या २० विद्यापीठांचे खेळाडू या महोत्सवात सहभागी होणार आहेत. या महोत्सवाच्या वातावरण निर्मितीसाठी तुळजापूर ते औरंगाबाद अशी मशाल रॅली काढण्यात येणार आहे. तुळजाभानी मंदिरपासून बुधवारी दि.३० सकाळी १० वाजता सदर रॅली सुरु झाली. या रॅलीत राज्य राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त खेळाडू, क्रीडा शिक्षक, कोच, विद्यार्थी सहभागी झाले. चौसाळा, उस्मानाबाद, बीड, गेवराई, शहागड, अंबड, जालना, बदनापूर मार्गे ही रॅली २ नोव्हेंबर रोजी रात्री औरंगाबादेत पोहचेल. चिकलठाणा येथून क्रांतीचौक मार्गे विद्यापीठ क्रडा मैदान अशी ३ नोव्हेंबरचा मार्गक्रम असेल. या रॅलीत क्रांती चौकापासून मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले, प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ.भगवान साखळे, क्रीडा संचालक डॉ.दयानंद कांबळे, विभागप्रमुख डॉ.कल्पना झरीकर आदी सहभागी होणार आहेत. तसेच डॉ.चंद्रजीत जाधव व डॉ.उमेश सलगर (उस्मानाबाद), डॉ.एच.के.शेख व डॉ.शंकर धांडे (बीड), डॉ.यूसूफ पठाण व डॉ.सचिन देशमुख, डॉ.बप्पासाहेब मस्के व डॉ.भूजंग मस्के हे अनुक्रमे जिल्हयाचे अध्यक्ष व समन्वयक आहेत. तर डॉ.संदीप जगताप ही संपूर्ण रॅलीचे समन्वयक आहेत. या क्रीडा ज्योत रॅलीत मोठया संख्येने सहभागी होण्याचे आवाहन डॉ.दयानंद कांबळे व संयोजन समितीच्या सर्व सदस्यांनी केले आहे.
