सुरेश धस यांचा पत्रकार परिषदेत खुलासा
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : आष्टी तालुक्यातील देवस्थानच्या जमिनी घोटाळ्याप्रकरणी दाखल गुन्ह्याबाबत गुरूवारी आमदार सुरेश धस यांनी पत्रकार परिषद घेत आपल्यावरील आरोपाचे खंडन केले. आपल्यावरील आरोप बिनबुडाचे असून ते धादांत खोटे आहेत. देवस्थान जमिनी माझ्या व कुटुंबीयांच्या नावावर नाहीत असा खुलासा त्यांनी केला.

आष्टी तालुक्यातील देवस्थानच्या जमिनी घोटाळ्याप्रकरणी आ.सुरेश धस सह त्यांची पत्नी,व भावावर गुन्हा दाखल झाला आहे. केवळ बदनामी करण्याच्या हेतूने मी ज्या जुन्या पक्षात होतो त्यांनी संगणमताने माझी राज्यसस्तरीय व जिल्हास्तरीय स्तरातून केवळ बदनामी करण्याच्या हेतूने हे सुरु आहे. कसल्याही प्रकारची आप संपत्ती कमावलेली नाही हे राजकीय षडयंत्र असल्याने माझ्यासारखे अनेक नेत्यांवर गुन्हे दाखल होऊ शकतात. चौकशी झाल्यावर दुध का दुध पाणी का पाणी होईल माझ्यावर झालेले आरोप बिनबुडाचे असून चौकशी ला सामोरे जाण्यास तयार आहे. देवस्थान जमिनी बाबत झालेले आरोप आ.धस यांनी फेटाळून लावले आ. सुरेश धस यांनी आज दि.1 डिसेंबर रोजी सकाळी 11 निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषद घेत खुलासा केला आहे.
पुढे बोलताना म्हणाले की देवस्थान जमिनी माझ्या व कुटुंबीयांच्या नावावर नाही मच्छिंद्रनाथ देवस्थान ट्रस्ट वरती 2007 सालापासून मी विश्वस्त म्हणून काम करत आहे. मी एकटाच नसून दहा ते अकरा जण या ट्रस्ट मध्ये आहेत यावर कोर्टाने नेमलेल्या व्यक्तीने माझ्या पत्नीची रीतसर अध्यक्ष म्हणून नेमणूक केली आहे. 2010 पासून मी पिंपळेश्वर देवस्थानचे काम पाहत आहे. मी ज्या जुन्या पक्षात काम करत होतो त्या पक्षातील राज्यस्तरावरून व जिल्हा स्तरावरील राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप आमदार धसांनी केला हायकोर्टाच्या आदेशानुसार जे गुन्हे दाखल झाले आहेत. त्या चौकशीस सामोरे जाण्याची माझी तयारी आहे. पोलिसांना चौकशी करण्यासाठी सहकार्य करणार असून त्यांना सहकार्य करण्याची पूर्णपणे माझी तयारी आहे.
लोकसेवका विरोधात तक्रार आली तर कलम 17 अ अन्वये राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागते त्यांचे सरकार असतानाही सरकारने परवानगी दिली नाही जर असे घडत राहिले तर मग कुठल्याही राजकीय नेत्यावर गुन्हे दाखल होऊ शकतात येथुन पुढे अनेक नेते या पद्धतीचे बळी ठरू शकतात असे ही धस म्हणाले. ही आयिडया पद्धत आहे याचा अनेक राजकीय नेते बळी ठरू शकतात बदनामी करण्याच्या पलीकडे दुसरे यामध्ये काहीही नाही चौकशी झाल्यानंतर दूध का दूध पाणी का पाणी होईल मी कसल्याही प्रकारची अधिकची आप संपत्ती कमवली नसून प्रॉपर्टी पेक्षा माङयाकडे कर्जच जास्त आहे.माझ्यावर झालेले आरोप हे बिनबुडाचे असून राजकीय षडयंत्रापोटी केलेला हा आरोप असल्याने पत्रकार परिषदेत म्हणाले.
