या कंपनीची मालकी अदानी ग्रुप च्या एएमजी मीडीया नेटवर्क्सकडे
By MahaTimes ऑनलाइन |
नवी दिल्ली : एनडीटीव्हीचे वरिष्ठ पत्रकार रविश कुमार यांनी अखेर यांनी वरिष्ठ कार्यकारी संपादकपदाचा राजीनामा दिला आहे. कंपनीनं देखील त्यांचा राजीनामा स्विकारला असून हा राजीनामा तात्काळ प्रभावानं लागू होईल, असेही कंपनीने म्हटले आहे.
रविश कुमार हे दोन दशकांपासून एनडीटीव्हीचा अविभाज्य भाग बनले होते. NDTVमध्ये रविश कुमार अनेक कार्यक्रमाचं सुत्रसंचालन करत होते. यांमध्ये आठवड्याचा शो हमलोग, रविश की रिपोर्ट, देश की बात आणि प्राईम टाईम या कार्यक्रमांचा समावेश होता. त्यांना पत्रकारितेसाठी रमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला आहे.
एनडीटीव्हीच्या कर्मचाऱ्यांना पाठवण्यात आलेल्या अतंर्गत ईमेलवरमध्ये रविश कुमार यांच्या राजीनामा तात्काळ प्रभावानं मंजूर करण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. तळागळातील लोकांपर्यंत पोहोचून त्यांचे प्रश्न पोटतिडकीनं मांडण्याासाठी रविश कुमार ओळखले जातात. पत्रकारितेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना दोनदा प्रतिष्ठित रामनाथ गोयंका एक्सलेन्स इन जर्नालिझम अवॉर्डनं सन्मानित करण्यात आलं आहे. तसेच आशियातील नोबेल पुरस्कार मानल्या जाणाऱ्या रॅमन मॅगेसेसे पुरस्कारानं त्यांना सन 2019 मध्ये सन्मानितही करण्यात आलं आहे.
प्रणोय रॉय आणि राधिका रॉय यांचाही नुकताच राजीनामा
एनडीटीव्हीचे प्रवर्तक आणि संचालक प्रणय रॉय आणि राधिका रॉय यांनी यांनी नुकताच आपल्या पदांचा राजीनामा दिला. कंपनीकडूनही दोघांचे राजीनामे तात्काळ मंजूर करण्यात आले होते. त्यानंतर सुदिप्त भट्टाचार्य, संजय पुगलिया आणि संथिल समिया चंगलवारयान यांना तत्काळ एनडीटीव्हीचं संचालक बनवण्यात आलं. आरआरपीआर होल्डिंगच्या शेअर्सच्या हस्तांतरणामुळं अदानी समूहाला एनडीटीव्हीमध्ये 29.18 टक्के हिस्सा मिळणार आहे. यांसह अदानी समूहाकडून 5 डिसेंबरला अतिरिक्त 26 टक्के समभागासाठी खुली ऑफर दिली आहे.