हिंदू देवस्थान जमिनीचे बेकायदेशीर हस्तांतरण केल्याचा आरोप
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : आष्टी तालुक्यातील जमीन घोटाळाप्रकरणी अखेर भाजपा आमदार सुरेश धस यांच्यासह सहा जणांविरूध्द भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988, बनावट कागदपत्रे तयार करून कट रचून फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल झाला. त्यांच्यावर कथित आठ हिंदू देवस्थान जमिनीचे बेकायदेशीर हस्तांतरण केल्याचा आरोप आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

आमदार सुरेश धस यांच्यासह त्यांच्या भाजपा आमदार सुरेश धस यांच्यासह त्यांची पत्नी प्राजक्ता धस, बंधू देविदास धस, मनोज रत्नपारखी, अस्लम नवाब खान व अन्य एकाचा समावेश आहे.
जिल्ह्यातील हिंदू देवस्थान जमीन घोटाळा प्रकरणात गुन्हे दाखल करून चौकशी करावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते राम खाडे पाठपुरावा करीत आहेत. खाडे यांच्याच याचिकेवरून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने 18 ऑक्टोबर रोजी राम खाडे यांनी तक्रार दिली होती. विशेष बाब म्हणजे, औरंगाबाद खंडपीठाने याप्रकरणातील तक्रारदाराचे निवेदनच एफआयआर म्हणून गृहीत धरावे, असे सांगितले होते. त्यानंतर आमदार सुरेश धस यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. मात्र जे औरंगाबाद खंडपीठाने आदेश दिले होते, तेच आदेश सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवले होते.
त्यानंतर बीडच्या लाचलुचपत पथकाने मंगळवारी रात्री उशीरा आमदार सुरेश धस यांच्यासह संबधितांवर लाचलुचपत प्रतिबंधक कायदा 1988 चे 13 (1) (अ) (ब), 13 (2) भ्रप्रअ व सह कलम 420, 465, 467, 468, 471, 120 (ब) 109 भारतीय दंड संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास एसीबीचे उपअधीक्षक शंकर शिंदे करत आहेत.
