दरवर्षीप्रमाणे यावर्षीही घवघवीत यश
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : शहरातील अंजुमन ईशाअत ए तालीम संचलित मिल्लीया कनिष्ठ महाविद्यालयातील दहा विद्यार्थ्यांचा देशाच्या विविध वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एमबीबीएस साठी प्रवेश निश्चित झाला आहे. यामुळे महाविद्यालयाने नेहमीप्रमाणे आपली पताका वैद्यकिय क्षेत्रात पुन्हा एकदा डौलाने फडकविली आहे.
यंदाही विज्ञान शाखेतील दहा विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी वैद्यकीय क्षेत्रात चांगले यश प्राप्त करून एमबीबीएस मध्ये प्रवेश मिळविला आहे. यामधून काही जण महाराष्ट्रात तर काहीजण इतर राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणार आहेत. या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये इन्शा फिरोज शेख उस्मानिया मेडिकल कॉलेज, हैदराबाद. सय्यद मसरूर फातिमा सय्यद अब्दुल सत्तार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद. सय्यद फैजान सय्यद मोईनुद्दीन वैद्यकीय महाविद्यालय, बदनापूर, जि. जालना. तन्जिला तसलीम शेख नसीर अहेमद वैद्यकीय महाविद्यालय, बदनापूर, जि. जालना. इरम सबा शकील वैद्यकीय महाविद्यालय बदनापूर, जि. जालना. तारीख अहेमद शेख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, उस्मानाबाद. रोशनी मुबारक शेख व्ही. आर.के. वैद्यकीय महाविद्यालय, हैदराबाद. खान आयेशा मसूद शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, काजी मुहम्मद वजीरोद्दीन मुहम्मद कलीमोद्दीन व्ही.आय. वैद्यकीय महाविद्यालय, दिल्ली आणि शेख नासेर मुदस्सीर अहेमद एम.जी.एम. वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद मध्ये नंबर लागला असून हे सर्व विद्यार्थी निवड झालेल्या वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस चे शिक्षण घेणार आहेत.
या सर्वांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. सलीम बिन अहेमद, सचिव खान सबीहा बेगम, प्राचार्य सय्यद अब्दुल सत्तार, डॉ. शेख समीर, डॉ. फैसल चाऊस, प्रा. जावेद पाशा, सय्यद अब्दुल रज्जाक आणि सर्व शिक्षकगण व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी या सर्वांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
माजी विद्यार्थी देश-विदेशात मोठ्या प्रतिष्ठित पदांवर कार्यरत
मिल्लीया कनिष्ठ महाविद्यालय कला आणि विज्ञान शाखेत फक्त बीड जिल्हाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात नावाजलेले महाविद्यालय आहे. येथून दरवर्षी कला व विज्ञान शाखेतील विद्यार्थी आपण मिळविलेल्या गुणवत्तेवर पुढे जाऊन त्या-त्या क्षेत्रात चांगले नावलौकिक करून समाजात एक जबाबदार आणि यशस्वी नागरिक म्हणून कार्यरत आहेत. आतापर्यंत मिल्लीया कनिष्ठ महाविद्यालयामधून शिक्षण घेऊन वैद्यकीय क्षेत्रामध्ये पाचशे पेक्षा जास्त विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. यातील अनेक जण विदेशात जाऊन सुद्धा वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत तसेच देशात सुद्धा काहीजण शासकीय रुग्णालयांमध्ये कार्यरत आहेत तर काहींनी आपला स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय चालविला आहे. याशिवाय अभियंता म्हणून ही हजारो विद्यार्थी देश-विदेशात कार्यरत असून ते तिथे आपली सेवा यशस्वीपणे देत आहेत. कला विभागातील शेकडो विद्यार्थी न्यायालयीन क्षेत्रामध्ये वकील म्हणून तर काहीजण न्यायाधीश म्हणूनही कर्तव्यरत आहेत.