माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या आग्रही मागणीला यश
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : शासनाच्या वतीने ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी जलजीवन मिशन योजना राबवण्यात येत आहे बीड मतदारसंघातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या समस्या उद्भवत असतात त्यामुळे या गावांना या योजनेअंतर्गत निधी मिळावा आणि ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी अशी आग्रही मागणी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केली होती त्यांच्या या मागणीला यश आले आहे जल जीवन मिशन अंतर्गत 116.54 कोटी रुपयांची कामे होणार असून बीड मतदार संघातील 137 गावांची तहान भागणार आहे.
बीड मतदार संघातील मेंगडेवाडी 22.48 लक्ष, मार्कडवाडी 36.84 लक्ष, शहाबाजपुर 38.26 लक्ष, सुरडी थोट 41.86 लक्ष, धावज्याची वाडी 57.36 लक्ष, डिसलेवाडी 62.69 लक्ष, गंगनाथवाडी 64.21 लक्ष, वैतागवाडी 64.42 लक्ष, खंडरस 76.03 लक्ष, कळसंबर 89.84 लक्ष, गवळवाडी 80.96 लक्ष, सफेपुर 85.29 लक्ष, वानगाव 86.61 लक्ष, साखरे बोरगाव 107.79 लक्ष, पिंपरनई 142.22 लक्ष, ताडसोन्ना 154.90 लक्ष, तागडगाव 147.83 लक्ष, नाळवंडी 311.56 लक्ष असे एकुण 1633.25 लक्ष रुपयांच्या निविदा दिनांक 8 सप्टेंबर 2022 रोजी प्रकाशित झाल्या होत्या.
बीड तालुक्यातील 24 कोटी 16 लक्ष रुपयाच्या निविदा दिनांक 6 ऑक्टोबर 2022 रोजी प्रकाशित झाल्या त्यामध्ये पुढील गावांचा समावेश आहे. बेलेवाडी, काकडहिरा, दहिफळ, गुंडेवाडी, भोरदेवी, नागापूर, कोल्हारवाडी, पोठरा, मुर्शदपुर घाट, मांडवखेल, कोळवाडी, काठोटवाडी, हिंगणी, सावरगाव घाट, तांदळ्याचीवाडी, वाकनाथपूर, राक्षसभुवन, बेलापुरी, कुंभारी, कानडी घाट, घोसापुरी, जिरेवाडी, वडगाव, सौदाना, बाभळवाडी, बोरफडी, चिंचोली, बीड मतदार संघ शिरूर तालुका याच दिवशी बरगवाडी 52.77 लक्ष, टाकळवाडी 90 लक्ष, वंजारवाडी 95.19 लक्ष, घुगेवाडी 87.37 लक्ष, हटकरवाडी आव्हळवाडी 164.11 लक्ष, मालकाचीवाडी 130 .50 लक्ष, नागरेवाडी 54.27 लक्ष, धनगरवाडी 107.72 लक्ष असे एकूण 781.93 लक्ष रुपयांच्या निविदा प्रकाशित झालेल्या आहेत. त्याचबरोबर दिनांक 21 ऑक्टोबर 2022 रोजी बीड तालुक्यातून किन्हीपाई 19.54 लक्ष, गोगलवाडी 19.38 लक्ष, गवारी 40.13 लक्ष, रज्जाकपूर 40.13 लक्ष, वलीपूर 56.61 लक्ष, बाळापुर 61.19 लक्ष, बेलगाव 62.58 लक्ष, अंथरवण पिंपरी तांडा 96.76 लक्ष, पालसिंगन 121.19 लक्ष, तांदळवाडी घाट 126.97 लक्ष, शिरूर तालुक्यातून रूपेवाडी 52.77 लक्ष असे एकूण 697.21 लक्ष रुपयाच्या निविदा प्रकाशित करण्यात आल्या.
तसेच यापूर्वीही बीड तालुका भंडारवाडी 65.21 लक्ष, जाधव वाडी 43.12 लक्ष, सानपवाडी 73.68 लक्ष, आहेर लिमगाव 20 लक्ष, मोरगाव 143.98 लक्ष, वायभटवाडी 90.59 लक्ष, पिंपळ घाट 41.14 लक्ष, जैताळवाडी 85.75 लक्ष, भवनवाडी 122.60 लक्ष, खडकी घाट 45 लक्ष, रामगाव 22 लक्ष, अंबिलवडगाव 48.11 लक्ष, काठोडा 56.40 लक्ष, लोणी शहाजनपूर 98.93 लक्ष, सोनपेठवाडी 85.32 लक्ष, सात्रा चांदणी 129.65 लक्ष, आडगाव 85.57 लक्ष, मानकूरवाडी 55.11 लक्ष, पारगाव शिरस 90.65 लक्ष, शिदोड 78.27 लक्ष, बेलखंडी पाटोदा 120.15 लक्ष, कर्जनी 85.77 लक्ष, जरूड 75.66 लक्ष, वडगाव गुंधा 158.64 लक्ष, नागपुर खुर्द 52.91 लक्ष, करचुंडी 138.87 लक्ष, खांडेपरगाव 113.17 लक्ष, अंथरवन पिंपरी 91.42 लक्ष, घोडका राजुरी 149 लक्ष, चर्हाटा 134 लक्ष, गोरेगाव वासनवाडी 75.62 लक्ष, मौजवाडी 61.67 लक्ष, धनगरवाडी 78.40 लक्ष, पाटेगाव मुगगाव 51.38 लक्ष, ब्रह्मगाव 192.79 लक्ष, शिरूर तालुका ढोकवड 28.71 लक्ष, गाजीपुर 26 लक्ष, येवलवाडी 32.45 लक्ष, शिरापूर गात 80 लक्ष, पौंडुळ 124.88 लक्ष, खांबा 52.50 लक्ष, लिंबा 89.31 लक्ष, सांगळवाडी 50.99 लक्ष असे एकूण 3018.53 लक्ष रुपयाच्या निविदा प्रकाशित झालेल्या आहेत.
दिनांक 17 नोव्हेंबर 2022 रोजी ससेवाडी 19.36 लक्ष, आहेर लिमगाव 19.98 लक्ष, निर्मळवाडी 20.68 लक्ष, इमामपूर 37.40 लक्ष, पोखरी लिंबा 37.73 लक्ष, कांबी 40.70 लक्ष, बहादरपुर 43.87 लक्ष, औरंगपूर शिरूर तालुका 43.38 लक्ष, रत्नागिरी 52.90 लक्ष, जांब 54.65 लक्ष, पिंपळादेवी 55.76 लक्ष, मुर्शदपूर 56.76 लक्ष, मुळकवाडी 61.61 लक्ष, कारळवाडी 66.31 लक्ष, नागझरी 68.34 लक्ष, आनंदवाडी 68.45 लक्ष, उदंड वडगाव 71.84 लक्ष, पिंपळगव्हाण 73.55 लक्ष, आहेर चिंचोली 75.43 लक्ष, पिंपळगाव 19.77 लक्ष, साक्षाळपिंप्री 82.05 लक्ष, लोणी घाट 83.09 लक्ष, परभणी 83.60 लक्ष, हिंगणी 91.36 लक्ष, कुटेवाडी 95 लक्ष, पाडळी 97.50 लक्ष, चाकरवाडी 103.87 लक्ष, शिरापूर धुमाळ 106.19 लक्ष, हिवरसिंगा 107.47 लक्ष, आहेर धानोरा 114.61 लक्ष, देवी बाभुळगाव 114.77 लक्ष, वरवटी 122.28 लक्ष, वांगी 126.97 लक्ष, पालवन 167.84 लक्ष, नाथापुर 178.11 लक्ष, आर्वी 267.97 लक्ष असे एकूण 3044.13लक्ष रुपयांच्या निविदा प्रकाशित झाल्या आहेत.
बीड मतदार संघामध्ये एकूण 137 गावांच्या जलजीवन मिशन अंतर्गत होणार्या नळ योजनेच्या कामासाठी 11654.05 लक्ष रुपयांच्या निविदा प्रक्रिया राबवल्या जात आहेत. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या मागणीला आणि विनंतीला मान देऊन एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील या सर्वांचे आभार बीड मतदारसंघातील जनता मानत आहे.