इच्छुक उमेदवारांनी लाभ घ्यावा – अतुल केसकर
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अल्पसंख्यांक समाजातील दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सात नवीन व्यावसायिक अभ्यासक्रम विनामूल्य शिकण्याची सुवर्णसंधी शासनाने उपलब्ध करून दिली आहे. याचा इच्छुक उमेदवारांनी लाभ घ्यावा असे आवाहन शासकीय जिल्हा व्यवसाय व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे अधिकारी अतुल केसकर यांनी केले आहे.

अल्पसंख्यांक समाजातील युवक-युवतींसाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमार्फत अल्प मुदतीचे कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येतात. या अनुषंगाने अल्पसंख्यांक विभागामार्फत मुस्लिम, शीख, जैन, पारशी, बुद्धिस्ट, आणि ख्रिश्चन उमेदवारांसाठी शासकीय जिल्हा औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात डोमेस्टिक डाटा एन्ट्री, ऑटोमोटिव्ह सर्विस टेक्निशियन, सीएनसी ऑपरेटर/मशिनिंग टेक्निशियन, लेथ ऑपरेटर, रिपेअर वेल्डर, सर्विस टेक्निशियन टू व्हीलर, एलईडी लाईट रिपेअर टेक्निशियन असे एनएसक्यूएफ वर आधारित व्यवसाय अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यातील प्रत्येक कोर्स साठी बीड जिल्हा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रत्येकी ३० उमेदवारांना विनामूल्य प्रशिक्षण घेण्याची संधी शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या संधीचा दहावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांनी लाभ घ्यावा असे आवाहन शासकीय जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण अधिकारी अतुल केसकर यांनी केले आहे.
प्रवेश घेण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, अल्पसंख्यांक असल्याचा पुरावा (सर्वांच्या झेरॉक्स प्रती) आणि दोन पासपोर्ट साईज फोटो घेऊन जिल्हा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत यावे. अधिक माहितीसाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांशी संपर्क साधावा.
