जुनी तहसीलच्या जागेत ऊर्दू घर बांधण्यात यावे – सुफियान मनियार
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : उर्दू भाषेची प्रगती, मराठी व उर्दू भाषेमधील लेखक, कवी, विचारवंत इ. मध्ये सर्जनशील विचारांची देवाणघेवाण होऊन उर्दू भाषेचा विकास व्हावा. शासन निर्णय होऊन ६ महिने झाले तरी उर्दु घर साठी स्थानिक प्रशासनाकडून कोणतीही हालचाल करण्यात आली नाही. बीड येथील जुनी तहसीलच्या जागेत ऊर्दू घर बांधण्यात यावे अशी मागणी लोकसेना संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुफियान मनियार यांनी केली आहे.
दिनांक ०६/०५/२०२२ शासन निर्णय च्यानुसार महाराष्ट्रात उर्दू भाषेची प्रगती, मराठी व उर्दू भाषेमधील लेखक, कवी, विचारवंत इ. मध्ये सर्जनशील विचारांची देवाणघेवाण होऊन उर्दू भाषेचा विकास व्हावा व उर्दू भाषेच्या समृध्दीसाठी उर्दू घराच्या रुपाने एक ठिकाण असावे या उद्देशाने राज्यातील उर्दू भाषिकांचे प्रमाण जास्त असलेल्या शहरामध्ये उर्दू घरे उभारण्यात येत आहेत. या मध्ये बीड शहराचा पण समावेश आहे. उर्दू घराच्या बांधकामासाठी अल्पसंख्याक विकास विभागाकडे मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करणे बंधनकारक आहे. उर्दू घरांच्या बांधकामासाठी जिल्हाधिकाऱ्यामार्फत संबंधित यंत्रणांना निधी वितरित करण्यात येईल. उर्दू घरामध्ये ऑडिटोरिअम ज्यात नाटक होऊ शकेल अशा प्रकारचे स्टेज, दोन सेमीनार हॉल, स्टोअर रूम, २- क्लासरुम, अभ्यागतासाठी स्वतंत्र स्वच्छतागृह (महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र), महिलांसाठी विश्राम गृह, आंमत्रित व्याख्यातासाठी स्वच्छतागृहासह २ कक्ष, ग्रंथालय, व्यवस्थापक, स्वच्छतागृहसह खोली, चौकीदारासाठी निरीक्षण खोल्या, पार्कंगची व्यवस्था, अल्पोपहार कॉर्नर, उर्दू घराच्या आजूबाजूला वृक्ष लागवडीची व्यवस्था, रेन हार्वेस्टींगची व्यवस्था, या सुविधा असणार आहेत.
शहरातली जुनी तहसीलची जागा अनेक वर्षापासून रिकामी आहे\ सदर जागा अल्पसंख्याक विकास विभागाच्या नावे हस्तांतर करुन भूखंडाचा ताबा अल्पसंख्याक विकास विभागाकडे सुपूर्द करुन लवकरात लवकर उर्दू घर/वाचनालय बांधण्यात यावे अशी मागणी लोकसेना सांघटना तर्फे प्रमुख प्रा. इलियास इनामदार सर यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी साहेब यांना निवेदन देऊन करण्यात आली. अन्यथा लोकसेना प्रमुख इलियास इनामदार सर यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा लोकसेना संघटना बीड जिल्हाध्यक्ष सुफियान मनियार यांनी दिली आहे. यावेळी लोकसेना उपाध्यक्ष मिर्झा कैसर बेग, काझी जफर साहेब, मिर्झा नदीम बेग साहेब, शहर अध्यक्ष आयाझ शेख, उपाध्यक्ष शेख समीर, शेख अफ्फान व इतर उपस्थित होते.