अहमदनगर जिल्हा प्रदेश तैलीक महासभेची जिल्हास्तर बैठक बीड येथे संपन्न
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : अहमदनगर जिल्हा प्रदेश तैलीक महासभेची जिल्हास्तर आढावा बैठक मंगळवारी बीड येथे माजी मंत्री तथा अखिल भारतीय प्रांतीक तैलीक महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष जयदत्त क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

या बैठकीत जिल्ह्यातील पदाधिकार्यांची निवड करण्यात आली. भागवत लुटे (साकुरी) यांची प्रदेश उपाध्यक्षपदी, रविंद्र कर्पे यांची उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी, सागर भगत यांची नाशिक युवा आघाडी उपाध्यक्षपदी तर चंद्रकांत बळवंत शेजुळ यांची अहमदनगर जिल्हा निरीक्षकपदी निवड करण्यात आली आहे. सर्व पदाधिकार्यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी प्रदेश तैलीक महासभेचे प्रदेश सेक्रेटरी विजय काळे, नाशिक विभागीय कार्याध्यक्ष अरविंद दारुणकर, अहमदनगर जिल्हाअध्यक्ष एकनाथराव नागले, अहमदनगर जिल्हा युवा अध्यक्ष सोमनाथ देवकर, अहमदनगर शहर युवा अध्यक्ष नितीन फल्ले, जेष्ठ मार्गदर्शक दिलीप साळुंके, बाळकृष्ण दारुणकर, संतोष मेहेत्रे, जामखेड येथील प्रशांत शिंदे, पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
