इकबाल टीपू आज़ाद महोत्सवात इतिहासकार सरफराज़ अहमद यांचे विचार
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : थोर स्वत्रंतासेनानी यांचा स्वातंत्र्य पूर्व इतिहास हा देशातील दोन्ही समाजाला गंगा जमुना तहेज़ीबी सारखा जोडणारा आहे. प्रत्येक नागरिकाने यांच्या विषयी माहिती स्वत घेणे इतरांना सांगावे असे आहे. टिपू सुलतान जीवंत असे पर्यंत इंग्रजांना भारतावर कब्ज़ा करणे अशक्य होते पण ज्यादिवशी टिपू सुलतान देशासाठी इंग्रजांच्या विरोधात युद्धामध्ये शहीद झाले त्यादिवशी खर्या अर्थाने पूर्ण भारत देश इंग्रजांच्या अधिपत्याखाली आला. असे विचार सोलापुरहुन आलेले प्रसिद्ध इतिहासकार व्याख्याते सरफराज़ अहमद यांनी मांडले.
देशातील स्वतंत्रता सेनानी व राष्ट्रपुरु षांचे कार्य व बलिदान समाजाला माहिती व्हावे म्हणून ज़शने यौमे पैदाइश इकबाल टीपू आज़ाद पाच दिवसीय महोत्सव लोकसेना संघटनेच्या वतीने बीडला साजरा होत आहे. यातील पाचवा दिवस इकबाल टिपू आज़ाद कॉन्फ्रेंसचा म्हणजेच व्याख्यानाचा होता पाच दिवसीय कार्यक्र माची माहिती प्रा. इलियास इनामदार यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात सांगितली.
राष्ट्रीय कवी डॉ. अल्लामा इकबाल यांच्यावर व्याख्यान औरंगाबादचे प्रसिद्ध व्याख्याते डॉ. इरतेकाज़ अफज़ल सर करणार होते परंतु त्यांना किडनीचा त्रास होत असल्यामुळे ते कार्यक्र माला उपस्थित राहू शकले नाही त्यांच्या जागी अब्दुल रहीम साकिब सर यांनी इकबाल यांच्यावर सविस्तर माहिती सांगितली. भारतरत्न मौलाना अबुल कलाम आज़ाद यांच्यावर व्याख्यान देण्यासाठी सोलापुरहुन जमियत उलेमा-ए-हिंदचे राष्ट्रीय पदाधिकारी प्रसिद्ध व्याख्याते मौलाना इब्राहिम कासमी साहेब आले होते. त्यांनी मौलाना आज़ाद यांच्या जीवनावर, त्यांच्या शैक्षणिक योगदानावर प्रकाश टाकला. यावेळी त्यांनी अबुल कलाम यांनी भारतीय समाजाला दिलेला एकता एकात्मतेचा संदेश या विषयी सविस्तर माहिती दिली. मिर्ज़ा नदीम बेग व लोकसेना संघटना जिल्हाप्रमुख सुफियान मणियार यांनी कार्यक्र माला आलेल्यांचे आभार व्यक्त केले.
या कार्यक्र माला जमियत उलेमा-ए-हिंदचे बीड जिल्हाध्यक्ष मुफ्ती अब्दुल्लाह कासमी, हाजी अब्दुल खालेक पेंटर, शेरजमा खान, मौलाना ज़फर काज़ी, अरशद सिद्दीकी, हसीन अखतर, काज़ी मुजीबूर रहेमान, दिव्यवार्ताचे संपादक अबूबकर चाऊस, उर्दू शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुजतबा अहमद खान, लोकमत समाचारचे जिल्हा प्रतिनिधी एजाज़ अहमद, जमाते इस्लामीचे एसआईओचे सदर हमीद सर व त्यांची संपूर्ण टीम, मुप्टा उर्दू संघटनेचे राज्य सचिव शाहेद कादरी, टिपू सुलतान ब्रिगेडचे बीड जिल्हाध्यक्ष डॉ. नदीम खान, समाजसेवक जुनेद अतार, उदगीरचे नगरसेवक अहमद सरवर, आमेर मदनी, शाहनवाज़ खान, समीर सरकार आदिसह शहरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्र माला यशस्वी करण्यासाठी मिर्ज़ा खैसर बेग, सुफियान मणियार, अयाज़अखतर, शेख समीर, मिर्ज़ा नदीम बेग, गुलाम साकिब सर, शेख रज़ी, अफ्फान भाई, नदीम मेंबर, कलीम काज़ी व मित्रमंडळ यांनी प्रयत्न केले.