लोकसेना चे आयोजन : रविवारी चित्र प्रदर्शनी व सायंकाळी व्याख्यान
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : येथील लोकसेना संघटनेच्यावतीने आयोजित इकबाल टीपू आज़ाद महोत्सव दरम्यान बीड मध्ये अन्नदान व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शहीद टिपू सुलतान जयंती निमित्त आयोजित रक्तदान शिबिरास युवकांनी मोठा सहभाग नोंदविला. तर भारतरत्न मौलाना आज़ाद जयंतीनिमित्त अन्नदान वाटप करून या माध्यमातून गरजूंना मदतीचा हात दिला.
देशातील स्वतंत्रता सेनानी व राष्ट्रपुरु षांचे कार्य व बलिदान समाजाला माहिती व्हावे म्हणून ज़शने यौमे पैदाइश इकबाल टीपू आज़ाद पाच दिवसीय महोत्सव बीडला साजरा होत आहे. आयोजक प्रा. इलियास इनामदार म्हणाले की, पहिला दिवस नऊ नोव्हेम्बरला राष्ट्रीय कवी अल्लामा इकबाल यांच्या जयंती व आंतरराष्ट्रीय उर्दू दिनानिमित्त उर्दू मुशायरा (कवी सम्मलेन) घेण्यात आले. दहा नोव्हेम्बरला शहीद टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले व अकरा नोव्हेम्बरला भारतरत्न मौलाना आज़ाद यांच्या जयंतीनिमित्त गोरगरीबांना अन्नदान (लंगर ) करण्यात आले व बारा व तेरा नोव्हेम्बरला सकाळी 11 ते सायं.5 वाजेपर्यंत दोन दिवसीय शैक्षणिक व ऐतिहासिक चित्र प्रदर्शनी भरविण्यात आली आहे.
तसेच, तेरा नोव्हेम्बर रोजी सायं 6 वाजता इकबाल टिपू आज़ाद कॉन्फ्रेंस म्हणजेच जाहिरसभा व्याख्यान ठेवलेले आहे. प्रदर्शन व व्याख्यान मध्ये शहरवासियांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन लोकसेना संघटना प्रमुख अॅड. प्रा. इलियास इनामदार व निमत्रक शहीद टिपू सुलतान उत्सव समिति बीडच्या वतीने खैसर बेग, लोकसेना चे जिल्हाध्यक्ष सुफियान मणियार, गुलाम साकिब सर, मिर्झा नदीम बेग, मौलाना ज़फर काज़ी, अॅड. कलीम काज़ी, शेख अयाज़ अखतर, समीर शेख, शेख रज़ी, शेख नदीम मेंबर, आमेर मदनी, नवीद इनामदार, समाजसेवक शेख मोहसिन, शेख अफ्फान, काज़ी वज़ीरोद्दीन व सर्व समिति सदस्यांनी केली आहे.