बीड शहरातून निघणार भव्य ग्रंथदिंडी, भरगच्च कार्यक्रमाची रेलचेल
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : 26 वे मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन दि. 6 ते 8 नोव्हेंबर दरम्यान बीडमध्ये संपन्न होत आहे. पुण्याचे लेखक साहित्यिक पौलस बाघमारे हे अध्यक्षस्थान भूषविणार असून अल्फा ओमेगा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष आशिष शिंदे हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. या संमेलनाचे उद्घाटन रविवारी ( दि. 6 ) माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, आ. संदीप क्षीरसागर, एसपी नंदकुमार ठाकुर, आरडीसी संतोष राऊत, अतिरिक्त जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, डॉ. भारतभूषण क्षीरसागर, योगेश क्षीरसागर, शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप, यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
हे संमेलन शहरातील रेव्ह. नारायण वामन टिळक साहित्य नगरी, असेम्ब्लीज ऑफ गॉड चर्च, बसस्टँड समोर, बीड येथे होणार आहे. यावेळी ख्रिस्ती समाजात मानाचा माणला जाणारा जीवन गौरव पुरस्कार फादर हिलरी फर्नांडीस तर साहित्यभूषण पुरस्कार अनिल दहिवाडकर यांना दिला जाणार आहे. दुपारी 12.30 वाजता मराठमोळ्या पध्दतीने भव्य ग्रथदिंडी निघणार आहे. याचे मुख्य आकर्षण हे हत्ती-घोड्यांसह विविध महापुरुषांची केलेली वेषभूषा असणार आहे.
मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनामध्ये ख्रिस्ती समाजाविषयीचे समज आणि गैरसमज, विवाहितांच्या घटस्फोटांची कारणे व उपाय, शेतकरी आत्महत्या, अशा सामाजिक ज्वलंत विषयावर परिसंवा, कथाकथन चर्चासत्र, शोध निंबध यासह विविध महत्वाचे विषय असणार आहेत. त्यामध्ये रविवार दिनांक 6 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वा. प्रतिनिधींचे आगमन होणार असून दुपारी 12:30 ते 2:30 पर्यंत बीड शहरातून ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. ही ग्रंथ दिंडी सेंट अॅन्स स्कुल- येथून संत इग्नाती चर्च मार्गे विद्याभवन ए.जी. चर्च जालना रोड- बीड- बीड शहर पोलिस ठाणे- आण्णाभाऊ साठे चौक मार्गे रेव्ह. नारायण वामन टिळक साहित्य नगरी, असेम्ब्लीज ऑफ गॉड चर्च येथे कार्यक्रम स्थळी येणार आहे. सायंकाळी 4 वाजेपासून संमेलनाच्या मुख्य उद्घाटन समारंभाला सुरुवात होणार आहे. उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदिका मृदला घोडके या करणार आहेत.
प्रास्ताविक स्वगताध्यक्ष अशिष शिंदे हे करणार आहेत. यानंतर मावळते अध्यक्ष प्रा. डॉ. नाझरेथ मिस्किटा यांचे मनोगत होणार आहे. नुतन अध्यक्ष पौलस वाघमारे हे मनोगत व्यक्त करणार आहेत. त्यानंतर स्मरणिका प्रकाशन- पुस्तके प्रकाशन होणार आहे. रात्रीच्या जेवणानंतर मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या पहिल्या दिवशीचा समारोप नागपूरच्या सुगम स्वरांजली यांच्या वाद्यवृंदाच्या मनोरंजनाच्या कार्यक्रमाने होणार आहे.
तरी या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाला मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित रहावे असे अवाहन फादर प्रकाश भालेराव, सरचिटणीस चार्लस् सोनावणे, कोषाध्यक्ष प्रमविजय भालतिलक, स्वगताध्यक्ष अशिष शिंदे यांच्यासह किशोर पाटील, मारियन रेड्डी, सहचिटणीस बाबासाहेब गायकवाड, अशोक थोरात, अरुण गायकवाड, राजु जोसेफ, नितीन शिंदे, प्रितज म्हस्के, क्षितीज गायकवाड प्रतिक भालतिलक, स्तवन घुले, रेव्ह. अँनी सोनावणे, रेव्ह, सुनिल भोंगे, पा. संजय गायकवाड, पा. वारभुवन, पा. अमृत सोनवणे, पा. विल्सन कांबळे, पा.प्रकाश मजमुले, शर्मिला पाटील, निलीमा रामटेके, दिलीप चांदणे, पीटर रेड्डी, बिपीन देशमुख, सुरेश वादव, आतिष काळे, अविनाश चांदणे यांनी केले आहे.