पती बचावला; रेस्क्यू दरम्यान विहीरीत उडी मारलेल्या पवन पिंपळेचाही मृत्यू
By MahaTimes ऑनलाइन |
बुलढाणा : गाडी शिकत असताना एका महिलेचा ब्रेकऐवजी चुकून एक्सलरेटवर पाय पडल्यानं कार थेट रस्त्याच्या कडेवरील 40 फूट खोल विहीरीत कोसळल्याने झालेल्या अपघातात शिकाऊ कारचालक पत्नी आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला. या अपघात महिलेचा पती गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, मायलेकीच्या रेस्क्यू दरम्यान विहीरीत उडी मारलेल्या पवन पिपळे याचा मृत्यू झाला. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा शहरात आज गुरुवारी दुपारी ही घटना घडली.
याबाबत माहिती अशी की, देऊळगाव राजा शहरातील रामनगरात राहणारे शिक्षक अमोल मुरकुटे (39) व त्यांची पत्नी स्वाती मुरकुटे (35) यांना कार चालवण्याचे प्रशिक्षण देत होते. यावेळी कारमध्ये त्यांची मुलगी सिद्धी मुरकुटे (11) ही सुद्धा बसलेली होती. शहरातून चिखली मार्गाकडे कार जात असताना, कारसमोर आलेल्या दुचाकीला वाचवण्यासाठी महिलेनं ब्रेकऐवजी एक्सलरेटर दाबल्यानं सुसाट वेगानं घराजवळ असलेल्या विहिरीत कार कोसळली. विहिरीत पाणी असल्याने ही कार पाण्यात बुडाली. कार विहिरीत कोसळताना शिक्षक अमोल मुरकुटे यांनी कारच्या खिडकीतून बाहेर उडी मारल्याने सुदैवाने ते बचावले. मात्र कारचालक पत्नी व मुलीचा जागीच मृत्यू झाला. .
विहीरीतील पाण्यात कार बुडाल्याची बातमी पसरताच घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. देऊळगाव राजा ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. अस्मा शेख यांनी सांगितलं, “या घटनेतील पुरुषाच्या हाताला थोडासा मार लागला होता. त्यांना डिस्चार्च करण्यात आलं आहे. त्यांची तब्येत आता स्थिर आहे. मृत महिला आणि मुलीचा मृतदेह जवळपास 8 तासांनंतर बाहेर काढण्यात आला आहे. त्यांच्या मृतदेहांवर आता पोस्टमोर्टम करण्यात येणार आहे. तसेच मायलेकीच्या रेस्क्यू दरम्यान मायलेकीला वाचवायला विहीरीत उडी मारलेल्या पवन पिपळे (वय 24 वर्ष) तरुणाचाही मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.” Three Killed As Car Falls Into Well