पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिर येथे शानदार समारंभात गौरव
By MahaTimes ऑनलाइन |
पुणे : यशोधरा प्रशाला सोलापुर चे सह. शिक्षक नुरअहमद बशीर कारंजे यांना नुकतेच पूणे येथे आयोजित सन्मान सोहळ्यात डॉ कलाम राष्ट्र उभारणी प्रेरणा पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम जयंती निमित्त ड्रीम फौंडेशन,चाणक्य कुलगुरू अकाडमी व डॉ कलाम मिशन यांच्या संयुक्त तत्वावधानाने बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे आयोजित शानदार समारंभात आदर्श शिक्षक नुरअहमद बशीर कारंजे यांना श्री डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी ( IAS उपसंचालक यशदा पुणे ) यांच्या हस्ते राज्यस्तरीय डॉ कलाम राष्ट्र उभारणी प्रेरणा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी मा. श्री. मंगेश चिवटे ( कक्ष प्रमुख मा. मुख्यमंत्री विशेष कार्य अधिकारी), मा. श्री. संजय आवटे ( संपादक दै. लोकमत ,पुणे), मा. श्री डॉ अशोक नगरकर ( वरिष्ठ शास्त्रज्ञ डीआरडिओ पुणे ) मा. श्री. डॉ. बबन जोगदंड ( माध्यम व प्रकाशन यशदा पुणे), मा. श्री. नागनाथ येवले (डायरेक्टर येवले चहा ) व मा.श्री. काशिनाथ भतगुणकी ( संस्थापक अध्यक्ष ड्रीम फाउंडेशन, पुणे ) आदि मान्यवर उपस्थित होते. या पुरस्काराबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री रमेशजी सुतकर,संस्थेच्या सचिव सौ. विमल सुतकर मॅडम, प्रशालेचे प्राचार्य श्री. सुबोध सुतकर व सर्व सहकारी शिक्षक , मित्र परिवार यांनी अभिनंदन केले आहे.
आदर्श शिक्षक नुरअहमद बशीर कारंजे यांना शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रामध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल आतापर्यंत राज्य व राष्ट्र स्तरीय पुरस्कारासह आंतरराष्ट्रीय, एशियन पुरस्कार मिळाले आहेत.
