राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत यशस्वी शस्त्रक्रिया
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : दोन नवजात बालकांना जन्मजात डोळ्याची समस्या उदभवली होती. आरबीएसके कार्यक्रमांतर्गत बीड जिल्हा रुग्णालयात एसएनसीयु विभागात त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुरेश साबळे यांच्या प्रयत्नाने औरंगाबाद येथील डॉक्टर अनासपुरे यांच्याकडे सदरील बालकांना रेफर करण्यात आले. आणि त्यांच्यावर तेथे यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्याने त्यांना दृष्टी मिळाली.

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्र मांतर्गत बीड जिल्ह्यात एकूण 39 वैद्यकीय पथके कार्यरत असून त्यांच्यामार्फत अंगणवाडी शाळेत जाऊन झिरो ते पाच वर्षे वयोगटातील बालकांच्या तपासणी करून त्याच्या आई-विडलांना बालकांच्या आजाराविषयी जनजागृती आणि समुपदेशन केलं जात. काही बालकांना संभाव्य आजाराविषयी तालुकास्तरावर शिबीर घेऊन तिथे निदान व उपचार घेतले जातात. अशाच बीड तालुक्यातील दोन नवजात बालकांना डोळ्यांचा प्रॉब्लेम निर्माण झाला होता. आरबीएसके कार्यक्र मांतर्गत बीड जिल्हा रुग्णालयात त्या दोन बालकावर उपचार सुरू होते त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील डॉक्टर अनासपुरे यांच्याकडे एडमिट कडून त्यांच्यावर अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या माध्यमातून डोळ्याच्या लेझर शस्त्रक्रिया करण्यात आल्या.आता त्या दोन्ही नवजात बालकांना दिसू लागले.
आरबीएसके कार्यक्र मांतर्गत बीड जिल्हा रुग्णालयात एसएनसीयु विभागात दोन महिने वयाचे कु. शिफा अमजद बेग (रा. माळापुरी ) व शेख अहमद यासेर यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. नवजात हे बालके असल्यामुळे पुढील उपचारासाठी त्यांना औरंगाबाद येथील डॉक्टर अनासपुरे यांच्याकडे सदरील बालकांना रेफर करण्यात आले. लागलीच त्या दोन्ही बालकावर लेझर सेटिंग आत्या आधुनिक यंत्रसामग्रीच्या माध्यमातून त्यांच्या डोळ्यावरील शस्त्रक्रि या यशस्वी केल्या. एकतर लहान वय असल्याने आणि महागड्या शस्त्रक्रि या सामग्रीच्या माध्यमातून त्या बालकांच्या मोफत शस्त्रक्रि या करून घेतल्या. आता दोन्ही बालकांची प्रकृती चांगली असून त्यांना दोघांनाही दृष्टी मिळाली त्याचं समाधान त्यांच्या आई-विडलांच्या चेहर्यावर दिसून आलं.
नवजात बालकांच्या सर्व तपासण्या व उपचार मोफत -रुग्ण नातेवाईकांनी लाभ घ्यावा
बीड जिल्ह्यामध्ये आर बी एस के कार्यक्रमांतर्गत लहान बालकांच्या तपासण्या केल्या जातात यामध्ये प्रामुख्याने टुडे इको, बेरा तपासणी, आ. रो. पी. हृदयाची तपासणी अगदी मोफत केली जाते. झिरो ते सहा वर्षे वयोगटातील लहान बालकांना मोफत व वेळेवर उपचार जिल्हा रुग्णालय बीड तर्फे आव्हान करण्यात येते की राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्र मांतर्गत व जिल्हा रूग्णालयामार्फत जन्म जात समस्या असलेल्या बालकांच्या सर्व प्रकारच्या तपासण्या व उपचार मोफत करण्यात येत आहेत. आपल्या बालकाच्या आजाराविषयी सर्व प्रकारच्या चाचण्या व तपासणी मोफत जिल्हा रुग्णालय अंतर्गत केल्या जातात याचा सर्व रुग्ण नातेवाईकांनी लाभ घ्यावा असे आव्हान जिल्हा शल्लचिकित्सक डॉ. सुरेश साबळे. आरएमओ संतोष शहाणे तसेच या कार्यक्र माचे पर्यवेक्षक डॉ. राम आव्हाड व श्री तांगडे आर के. घोडके मोटेगावकर यांनी केले आहे.
