आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी क्षीरसागरांनी केलेला हा खटाटोप – नवनाथ शिराळे यांचा आरोप
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : काल जयदत्त क्षीरसागरांनी मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब व उप मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेब यांचा बळजबरीने पाठपुरावा करून, बीड शहरातील सत्त्तर कोटीचे 12 रस्ते कामाचा शुभारंभ ऑनलाईन पद्धतीने करून घेतला. बारा रस्त्यामध्ये राधाकृष्ण नगर या रस्त्याचा उल्लेख आहे. परुतू या नावाने बीड शहरात अथवा शासन दप्तरी राधाकृष्ण नगर नावाचे कोठेही नगर नाही. शहरात राधाकृष्ण नगर असल्याचे कायदेशीर सिद्ध करा आणि एक लाख रु. बक्षीस मिळवा असे आवाहनच नगर परीषद चे माजी सभापती भाजपा नेते नवनाथ शिराळे यांनी केले आहे.
प्रसिध्दी पत्रकात नवनाथ शिराळे यांनी म्हटले आहे की, सत्ता बदलताच क्षीरसागरांनी सरड्याप्रमाणे आपला रंग बदलला. कालचा कार्यक्र म हा केवळ जनतेची दिशाभूल करून, आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी केलेला खटाटोप आहे. या कार्यक्र मातून शासनाची दिशाभूल करत जनतेला ठकवण्याचा प्रयत्न क्षीरसागर कुटुंबांनी केला आहे. असा सणसणीत आरोप ही त्यांनी केला आहे.
राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्री यांनी उदार मनाने शहराच्या विकासासाठी सत्तर कोटी रु पयांचा भरीव निधी दिला. या निधीचा सदुपयोग व्हावा. शहरातील रस्ते सुव्यवस्थित व्हावेत आणि सर्व कामे दर्जेदार करावीत अशी सूचनाही मंत्री महोदयांनी केली.
परंतु बीडकरांचे दुर्दैव असे की, यातही क्षीरसागरांनी लबाडी केली आहे. ज्या बारा रस्त्यांसाठी शासनाने निधी दिला. त्या बारा रस्त्यांपैकी काही रस्त्याचे कामे यापूर्वीच झालेली आहेत. आमदार संदीप क्षीरसागर यांनी उद्घाटन केले आहेत. त्यापैकी काही अर्धवट रस्त्याचे फक्त नावे बदलून त्यावर निधी आणला गेला. बारा रस्त्यामध्ये राधाकृष्ण नगर या रस्त्याचा उल्लेख आहे. परंतु या नावाने बीड शहरात अथवा शासन दप्तरी राधाकृष्ण नगर नावाचे कोठेही नगर नाही. शिवाजीनगर – जुना धानोरा रस्ता हा असून, हा रस्ता दलित वस्ती सुधारणा योजनेंतर्गत वर्ष 2014 मध्येच काम पूर्ण झालेले आहे. विशेष म्हणजे या रस्त्याचे भूसंपादन व मावेजा संदर्भातील प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. हाच रस्ता राधाकृष्ण नगर या नावाने दाखवून निधी आणला आहे. काम अगोदरच झाले असेल, तर हा आणलेल्या निधीचे काय होणार हे नव्याने सांगण्याची गरज नाही.
निधी लाटण्याचा केवीलवाना प्रयत्न
मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री यांच्या हस्ते शुभारंभ करून, राजकीय हेतू साध्य करण्या बरोबरच निधी लाटण्याचा केवीलवाना प्रयत्न क्षीरसागर कुटूंब करत आहेत. नगर पालिकेचे प्रशासक व मुख्याधिकारी यांनी या बारा रस्त्याचे अंदाजपत्रक व रस्त्याचा नकाशा बँनरद्वारे प्रसिद्धी करून, नागरिकांना खरी माहिती द्यावी. हि आग्रहाची विनंती. या सत्तर कोटींच्या निधीमध्ये अफरातफर, भ्रष्ट्राचार, गैरवापर होणार नाही. याची पूर्ण दक्षता न.प. प्रशासनाने घ्यावी. अन्यथा जनतेच्या रोषास सामोरे जावे लागेल. असा इशारा नवनाथ शिराळे माजी सभापती तथा भाजपा नेते यांनी दिला आहे.