मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत निर्णय
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातर्फे मराठा समाजातील घटकांना व्यवसायासाठी एकरक्कमी बिनव्याजी कर्ज उपलब्ध देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच कर्ज घेण्यासाठी वयोमर्यादा 45 वरून 60 वर्ष करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मराठा आरक्षण उपसमितीची एक महत्वपूर्ण बैठक उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री तथा उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत नुकतीच पार पडली. या बैठकीत हे दो महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या निर्णय संदर्भात संबंधित विभागासा आदेश प्राप्त झाले नसून लवकरच यावर अंमलबजावणी होण्याचे संकेत मिळाले आहेत. या निर्णयाचा लाभ मराठा समाजातील सर्वच घटकांना निश्चितच होणार आहे.

या बैठकीत सारथी संस्था व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातील योजना आणि मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू असलेल्या सुविधेचा आढावा घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी ग्रामविकास व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, आमदार प्रवीण दरेकर, आमदार योगेश कदम, आमदार भरत गोगावले, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे उपसचिव प्रताप लुबाळ, महा ज्योती विभागाचे संचालक प्रसाद रेशमे, सारथी पुणे विभागाचे अशोक पाटील, श्री. देशमुख आदी उपस्थित होते.