शिवसेना अभेद्य राहणार, संपणार आहेत ते गद्दार – अनिल जगताप
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : जिल्ह्यात शिवसेनेची पहिला शाखा दणक्यात स्थापन झाली , शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांच्या उपस्थितीत शिवसेना ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ या शाखेचे मशाल पेटवुन उद्घाटन करण्यात आले. या शाखा उदघाटनाला शिवसैनिकांचा उत्साह प्रचंड होता, उद्घाटन प्रसंगी बोलतांना जिल्हाप्रमुख अनिल जगताप म्हणाले शिवसेना अभेद्य आहे, अभेद्य राहील, संपणार आहेत ते गद्दार .
बीड तालुक्यातील सोनपेठवाडी या गावात शाखा उदघाटनासाठी अख्खे गाव एकत्र आले होते. या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हा संघटक नितीन धांडे, जिल्हा समन्वयक बप्पा साहेब घुगे, बीड तालुकाप्रमुख गोरख सिंघन, शिव अल्पसंख्याक सेना जिल्हा संघटक हुसेन भाई शेख, शिवसेना उप तालुका प्रमुख मधुकर शिंदे, तालुका संघटक गोरख कदम, शिवाजी कोळगुडे आदी मान्यवर उपस्थित होते.
या शाखेच्या उद्घाटनप्रसंगी गावातील सर्व नागरिकांनी आम्ही पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत हे स्पष्ट केले.शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी बीड जिल्हा शिवसेना तुमच्या सुखदुःखात नेहमी उभी असेल असे आश्वासन दिले तसेच सध्याच्या राजकीय घडामोडींवर आपले मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणी जाग्या केल्या. शिवसेना-भाजप युतीत स्व.लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे योगदान कसे होते हे ही सांगण्यात आले. पुढे बोलतांना ते म्हणाले आमदार, खासदार, मंत्री सोडुन गेले तरी शिवसेना संपणार नाही उलट शिवसेनेसोबत ज्यांनी गद्दारी केली तेच संपणार आहेत हाच इतिहास आहे हे देखील नमुद केले.
या शाखेच्या माध्यमातुन गावातील लोकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी शाखेतील पदाधिकाऱ्यांनी काम करावे असे ही सांगण्यात आले. सोनपेठवाडीचे सरपंच नवनाथ तोंडे, शाखेचे शाखाप्रमुख म्हणुन संदीपान नागरगोजे, उपशहरप्रमुख अशोक भटे, मार्गदर्शक श्रीकांत तोंडे, सचिव संजय भटे, संघटक भिमराव भटे, गटप्रमुख रामनाथ तोंडे, कोषाध्यक्ष रमेश तोंडे, सहकोषाध्यक्ष सुरेश सुरवसे, सल्लागार बाजीराव भटे, बुथप्रमुख नितीन तोंडे, उपसंघटक दगडु भटे, या सर्वांचा बीड जिल्हा शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.