सोलापूर जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
By MahaTimes ऑनलाइन |
सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. येथील यशोधरा प्रशाला चे शिक्षक नुरअहमद बशीर कारंजे यांना आंतरराष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त तेलंगणा येथे झालेल्या सम्मान सोहळ्यात राष्ट्रीय स्तरावरील आदर्श शिक्षक पुरस्काराने सम्मानित करण्यात आले आहे.

अविष्कार सोशल अँड एज्युकेशनल फाउंडेशन, तेलंगणा. यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त आयोजित सन्मान सोहळ्यात श्री. नुरअहमद बशीर कारंजे यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2022 तेलंगाना हायकोर्टचे मा. चिफ जस्टीस चंद्रय्याजी (चेअरमन ह्युमन राईट कमिशन तेलंगाना स्टेट, हैदराबाद), मा. श्री. मधुकर स्वामेगारू IPS (DCP) तसेच संस्थेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष श्री संजय पवार (पत्रकार) व इतर मान्यवर यांच्या शुभ हस्ते सालार जंग म्युझियम हैदराबाद, तेलंगणा येथे पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

आदर्श शिक्षक नुरअहमद बशीर कारंजे यांनी नुकतेच ऑनलाईन आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरीय वेबिनार, क्युजेस व कोर्सेस देवुन 1000 पेक्षा जास्त सर्टिफिकेट मिळवले आहेत. याची नोंद वर्ल्ड ह्युमन बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये करण्यात आलेली आहे. त्याला प्रायोजक हेल्थ अँड फॅमिली वेल्फर, केमिकल अँड फर्टीलायझर, स्किल डेव्हलपमेंट केंद्रीय मंत्रालय भारत सरकार. या मिळालेल्या पुरस्काराबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री रमेशजी सुतकर सर,संस्थेच्या सचिव सौ. विमल सुतकर मॅडम, प्रशालेचे प्राचार्य श्री. सुबोध सुतकर सर व सर्व सहकारी शिक्षक, मित्र परिवार यांनी अभिनंदन केले.
शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रामध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे नुरअहमद बशीर कारंजे यांना आतापर्यंत आंतरराष्ट्रीय, एशियन,राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत.
