जिप अशोकनगर सह पाच शाळांना टाक्या वितरीत
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : ज्ञानदानाबरोबरच आदर्श शिक्षक शाम दामुरडे यांनी स्वखर्चाने पिण्याच्या पाण्याच्या टाक्या शाळांना उपलब्ध करून दिल्या त्यांचा हा स्तुत्य उपक्र म इतरांसाठी प्रेरणादायी आहे, असे विचार शिक्षणाधिकारी (माध्य.) श्रीकांत कुलकर्णी मांडले.
जिल्हा परिषद चे शिक्षक शाम दामुरडे यांनी स्वखर्चाने पाच पाण्याच्या टाक्या शाळांना भेट स्वरूपात दिल्या. येथील जिल्हा परिषद केंद्र आदर्श शाळा अशोकनगर येथे शनिवारी शिक्षणाधिकारी प्राथमिक जि.प.बीड मा.श्रीकांत कुलकर्णी यांच्या हस्ते जि.प.केंद्र अशोकनगर, गांधीनगर, कामखेडा, माळापुरी व आहेर चिंचोली या पाच शाळांना वितरीत करण्यात आल्या. या वेळी कुलकर्णी बोलत होते.
पुढे श्री. कुलकर्णी म्हणाले की, स्वत:च्या पगारातील दहा हजार रु पये मुलांच्या पिण्याच्या पाण्यासाठी वापरणे हे इस्लाम च्या जकात देवून पुण्य करणे होय. किंवा थोर महापुरु षांच्या कार्याची प्रेरणा होय. दामुरडे सरांची कार्याची प्रेरणा आपण सर्वांनी घ्यावी. असे आवाहन करून मी स्वत:हून एक टाकी इतर शाळेला देतो असे घोषित केले. यावेळी दामुरडे यांनी म्हटले की, मी हे सर्व कर्तत्व भावनेतुन करीत आहे. या पुढे मी माझे एका वर्षातील टार्गेट पन्नास हजार रूपया प्रयत्न वाढवणार आहे असल्याची इच्छा त्यांनी बोलून दाखविली.
या टाक्या वितरण कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक जि.प.केंद्र अशोकनगर बीड शेख मुसा यांनी केले. सदर टाक्या संबंधित शाळेचे मुख्याध्यापक व केंद्र प्रमुख यांना वॉरंटी कार्ड, पावती सह शेख अ. रशीद, मोमीन करीम, गवते विकास, इनामदार अलहाज, शेख निलोफर, शब्बीर खान, ससाणे मॅडम, घुगे सर, हकीम मनियार यांनी स्वीकारल्या. मार्गदर्शन पर मत स्थायी समिती सदस्य तथा मा.सभापती खुर्शीद आलम, केंद्र प्रमुख फेरोज पठाण यांनी व्यक्त केले. या कार्यक्र मास एकल शिक्षक संघटनेचे आर डी जाधव,जगन्नाथ खेडकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन अन्वर खान यांनी केले.