राजस्थानी मंगल कार्यालयात ‘इज्लासे आम’ कार्यक्रमाचे आयोजन
By MahaTimes ऑनलाइन |
मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड चे पदाधिकारी तथा इस्लामिक वक्ता मौलाना अबु तालिब रहमानी हे आज शुक्रवारी सायंकाळी माजलगावात सिरतुन्नबी विषयावर संबोधित करतील.

प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा जन्मोत्सव सर्वत्र साजरा केला जात आहे. ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमिपर आज, 14 आॅक्टोबर रोजी शहरातील राजस्थानी मंगल कार्यालय येथे (पूर्वीचे स्थान जुनी ईदगाह बदलले आहे) अजीमुश्शान इज्लासे आम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, पावसामुळे कार्यक्रमाचे स्थल अचानक बदलण्यात आले असुन राजस्थानी मंगल कार्यालयात कार्यक्रम संपन्न होणार आहे.
मौलाना अबु तालिब रहमानी हे इस्लाम धर्माचे अभ्यासक आहेत. ते वर्तमान विषयावर आपले विचार राखण्यात पारंगत आहेत. हिंदु-मुस्लिम ऐक्य, मानवता विषय ते प्राधान्याने मांडतात. त्यांचे विचार ऐकण्यासाठी लोक दुरून येतात.
