प्रतिष्ठीत डॉक्टर मंडळीसह सर्वच क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती, संचालक डॉ. फेरोज शेख यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : येथील प्रसिध्द ‘मॅक्सक्युअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल’ चा प्रथम वर्धापन मंगळवारी (दि. 11) रोजी मोठ्या थाटात संपन्न झाला. यावेळी वैद्यकीय, सामाजिक, राजनितीक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी कार्यक्र मास उपस्थित राहून संचालक डॉ. फेरोज शेख यांना शुभेच्छा दिल्या.
एकेकाळी बीड शहर व जिल्ह्यात आरोग्य सेवा एवढी सक्षम नव्हती. त्यामुळे रूग्ण व नातेवाईक पुणे, मुंबई सारख्या मेट्रो सिटीकडे जात होते. मात्र मागील कांही वर्षात परिस्थिती बदलली. आता बीड शहरात देखील अत्याधुनिक, दर्जेदार व सर्वोत्कृष्ट सेवा देणारे कांही रूग्णालय आहेत. यात ‘मॅक्सक्युअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल’चा समावेश आहे. या रूग्णालयाचे संचालक डॉ. फेरोज शेख यांनी रूग्णसेवेला प्राधान्य दिल्याने त्यांनी अल्पाविधतच लोकप्रियता कमावली.
मंगळवारी ‘मॅक्सक्युअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल’ चा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला. या प्रसंगी माजी आमदार सिराज देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे, सय्यद साजिद अली उर्फ बाबूभाई, मोईनुद्दीन (मास्टर साहेब), माजी उप नगराध्यक्ष फारुख पटेल, डॉ. अनुराग पांगरीकर साहेब, केजीएन ग्रुप चे प्रदेश अध्यक्ष सय्यद ज़हीरोद्दीन शाह कादरी, माजी नगरसेवक शेख इकबाल, अशपाक इनामदार, आरोग्य अधिकारी डॉ. इलियास खान, डॉ. साजिद बेग, इलियास, सिद्दीकी हाफिज साहेब, सय्यद डॉ. सय्यद शाफे, डॉ. जावेद सर, डॉ. जियाउरहमान, असलम अनवरी सर, नासिर अहमद खान सर, डॉ. सिराज आरजू, शेखर कुमार आदीसह शहरातील प्रतिष्ठीत डॉक्टर मंडळीसह सर्वच क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी उपस्थिती राहुन संचालक डॉ. फेरोज शेख यांच्यावर अक्षरश: शुभेच्छांचा वर्षाव केला.यावेळी उपस्थित होते.
‘मॅक्सक्युअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल’च्या प्रथम वर्धापन दिनाच्या अनुषंगाने 1 ते 15 ऑक्टोबर दरम्यान ‘सर्व रोग मोफत तपासणी पंधरवडा’ शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत शेकडो गरजूरूग्णांनी या शिबीराचा लाभ घेतला आहे. इफ्तेखार नगर, तेलगाव रोड, बीड येथे आयोजित हे शिबिर 15 ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे. या शिबिराचा जास्तीत जास्त रूग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन ही डॉ. फेरोज शेख यांनी केले आहे.
ऑल महाराष्ट्र के.जी.एन.ग्रुप चे अध्यक्ष सय्यद ज़हीर अली शाह कादरी व बीड चे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुरेश साबळे सर यांनी उपस्थीत राहून मॅक्सक्युर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चे संचालक डॉ फेरोज शेख यांना शुभेच्छा दिल्या. सोबत डॉ. मोईन सर, कलीम राज बेलदार, शाहीद शेख आदि. प्रसिध्द बालरोग तज्ञ तथा सीएनएस जीम चे संचालक डॉ. इलियास खान यांनी हॉस्पिटल’च्या प्रथम वर्धापनिदनानिमित्त संचालक डॉ फेरोज शेख यांना शुभेच्छा दिल्या.