बाबुराव कराड यांचे वृध्दापकाळाने निधन
गुरूवारी सकाळी 09 वाजता पांगरी येथे होणार अंत्यविधी
बीड (परळी) : माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय, परळी नगर परिषदेचे माजी गटनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड यांचे वडील बाबुराव राजाराम कराड यांचे आज (दि.12) दुपारी 3 च्या दरम्यान वृध्दापकाळाने निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 80 वर्षे इतके होते.

बाबुराव कराड यांच्या पार्थिवावर गुरूवारी सकाळी (दि.13) 09 वाजता पांगरी (ता.परळी), येथे विधीवत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. बाबुराव कराड हे गेल्या काही दिवसांपासून हृदयाच्या आजाराने त्रस्त होते, पुणे येथील एका नामांकित रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू, उपचारादरम्यान त्यांची आज दुपारी प्राणज्योत मालवली.
बाबुराव कराड यांच्या मागे पत्नी, वाल्मिकअण्णा कराड, महादेव कराड हे दोन मुले, मुलगी तसेच नातवंडे असा मोठा परिवार आहे. कराड परिवारावर ओढावलेल्या दु:खात ‘महाटाईम्स’ परिवार सहभागी आहे.