राजकीय क्षेत्रात खळबळ
बीड : भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी स्व:तावर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी 11वा. उघडकीस आली. ही घटना बीड शहरातील एमआयडीसी भागातील बियाणी यांच्या राहत्या घरी घडली. या घटनेने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
भगीरथ बियाणी यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
सोमवारी रात्री आपल्या कुटूंबासमवेत उशिरापर्यंत गप्पा मारल्या. पहाटेच्या सुमारास उशिरापर्यंत दरवाजा उघडला नसल्याने कुटूंबियाने पाहिले तर बियाणी हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांना तात्काल शहरातील एका खासगी रूग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाल्याचे सांगण्यात आले. भगीरथ बियाणी हे भाजप चे निस्सिम कार्यकर्ते होते. ते शांत व मनमिळावु स्वभावाचे व अभ्यासु नेतृत्व म्हणुन सर्व परिचित होते. दिवंगत नेता गोपीनाथ मुंडे यांच्यासह त्यांनी काम केले. त्यांच्यानंतर माजी मंत्री पंकजा मुंडे आणि खासदार प्रितम मुंडे यांचे अतिविश्वासु कार्यकर्ते होते. दरम्यान त्यांनी विविध पदावर काम केले.
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात ही योगदान
राजनितीक क्षेत्राबरोबरच सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात भगीरथ बियाणी यांनी रचनात्मक योगदान दिले. 5 वी ते 10 च्या विद्यार्थ्यांना आनलाइन उच्च शिक्षण देण्याचे त्यांचे स्वप्न होते. आजकाल चे युवक शुल्लक कारणावरून मारामारीला उतरतात, कायदा हातात घेतात. त्यांना टोकाचे पाउन उचण्यापासुन रोखण्यासाठी प्रयत्व व्हावे असे त्यांनी नुकतेच बोलले होते.