बीड शहरातील भरवस्तीत घडली घटना, सुदैवाने मोठी हानी टळली
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : शहराच्या पेठ बीड भागातील हिरालाल चौकात असलले अंदाजे दोनशे वर्षापूर्वीचे जुने झाड उन्मळून पडले. शनिवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास भरवस्तीत विशालकाय झाड पडले मात्र, सुदैवाने कोणतीही जीवीत हानी झाली नाही.
गेल्या दोन दिवसांपासुन सोसाट्याच्या वाऱ्यासह परतीचा पाऊस होत आहे. संततधार पावसामुळे भर वस्तीतील पिंपरीचे मोठे झाड रस्त्यावर उन्मळून पडले. या रस्त्यावर सकाळच्या वेळेस लोकांची तुरळक ये जा सुरू होती मात्र सुदैवाने मोठी हानी टळली.
हिरालाल चौकातील वैभव असणारे हे पिंपरीचे झाड अंदाजे जवळपास दोनशे वर्ष जुने होते, या झाडालगत असणारे कांही छोट्या व्यापाऱ्याचे नुकसान झाले. आज सकाळी हे झाड उन्मळून पडल्याने वाहतुक कांही वेळेसाठी खोळंबली होती.