आदर्श शिक्षक प्रभाकरराव मानूरकर यांचे निधन
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : जुन्या पिढीतील आदर्श शिक्षक प्रभाकरराव मानूरकर यांचे शनिवारी (दि.8 ) रोजी दिर्घ आजाराने निधन झाले. पत्रकार संतोष मानूरकर यांचे ते वडिल होत.

गेल्या काही वर्षापासून कर्करोगाने ते आजारी होते. बीड येथील डॉ. निल बारकुल आणि डॉ. संतोष शिंदे यांच्याकडे उपचार सुरु होते. काल त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मानूरकर गुरुजी यांच्या पार्थीवावर री (दि.9 )रोजी सकाळी 10 वाजता अमरधाम स्मशानभूमी मोंढा रोड येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहे.
बीड जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक म्हणून त्यांनी काम केले. राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना मिळाला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पत्रकार संतोष मानूरकर आणि चंपावती विद्यालयाचे शिक्षक प्रकाश मानूरकर यांचे ते वडिल होते. मानूरकर परिवारावर ओढावलेल्या दु:खात ‘महाटाईम्स’ परिवार सहभागी आहे.