ग्रामीण विकास मंडळ : अतिजोखमीच्या महिलांसाठीची कायदे व अधिकार जाणीव जागृती कार्यशाळा संपन्न
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : कायदा सगळ्यांसाठी समान व कायद्यापुढे सगळे समान. सुप्रिम कोर्टाच्या आदेशानूसार महिलांना कायदेविषयक जागृत करणे व त्यांच्या हक्का व अधिकाराविषयी त्यांनी माहित असावे. महिलांवर अनेक अत्याचार होत असतात. एफ.एस.डब्ल्यू. कोणीही सहखुशीने होत नाही. सगळे अनअवधानाने येतात. आजही काही महिलांना ओळखपत्र किंवा पूरावे नाही त्यामुळे शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही म्हणून कोर्टाने या पिडीत महिलांना पूरावा न मागता ओळखपत्र द्यावे. असे आदरणीय न्या. चेतन भागवत साहेब (दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, अंबाजोगाई) यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले.

ग्रामीण विकास मंडळ व विधी सेवा प्राधिकरण अंबाजोगाई आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, बीड यांच्या संयुक्त विद्यमाने अंबाजोगाई येथे दि. 19 रोजी एफ.एस.डब्ल्यू. व एम.एस.एम. / टि.जी. या अतिजोखमीच्या गटांसाठी कायदे व अधिकार जाणीव जागृती कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, अंबाजोगाईचे न्या. श्री. चेतन भागवत साहेब हे उपस्थित होते. तसेच मा. कविता नेरकर मॅडम अप्पर पोलिस अधिक्षक, अंबाजोगाई, मा. सुहास कुलकर्णी जिल्हा कार्यक्रम अधिकारी, डापकू जिल्हा रूग्णालय, बीड व संस्थेचे अध्यक्ष तथा प्रकल्प संचालक श्री. सय्यद एस.बी. सर हे व्यासपीठावर उपस्थित होते.

न्यायाधीश चेतन भागवत साहेब मार्गदर्शन करतांना म्हणाले की, पिडीत महिलांना उत्पन्नाचे साधन नसेल तर मोफत वकील दिला जातो. तसेच धरणग्रस्त, पूरग्रस्त, एस.सी.एस.टी. आणि मानसिक रूग्ण प्रमाणपत्र असणा-या पिडीत महिलांना पण मोफत वकिल पूरवला जातो. एक रूपयाचाही खर्च होणार नाही. अशी कायद्यात सोय आहे. बलात्कारीत महिला असेल तर त्याला पाच लाख शासन देते. सुरूवातीला तीस हजार दिले जातात. परंतु काही लाकांनी याचाही गैर वापर करण्यात सुरूवात केली होती. आम्ही तसे खोटे प्रकरणे असल्याचे लक्षात आले की लगेच त्यांच्याच विरूद्ध गुन्हा नांेद शकतो. कायद्याचे सर्वांनी पालन करावे, असे सुचित केले.
प्रस्ताविक श्री. सय्यद एस.बी. यांनी संस्था 1985 पासून समाज सेवा करित आहे. संस्थेचा मुळ उद्देश माता व मातीचे संवर्धन व संरक्षण करणे आहे. संस्थेची स्थापना जागतिक महिला दिनी झालेली आहे. अतिजोखमीच्या गटात आपण मोडत असल्याने गुप्तरोग व एच.आय.व्ही. चा बळी होऊ शकतो. त्यामुळे आपण नेहमी जागरूक राहिले पाहिजे. महिलांना आपण अधारकार्ड, राशनकार्ड, मतदानकार्ड तसेच इतर शासकीय योजनासह बचत गटाच्या माध्यमातुन संघटीत केले आहे. महिलांच्या समस्या व त्यांची व त्यांच्या कुटंूबाची काळजी घेण्यासाठी लक्षगट हस्तक्षेप प्रकल्प राबवित असतो.

उपस्थितांना मार्गदर्शन करतांना सुहास कुलकर्णी जिल्हा कार्यक्रम अधिकारी, डापकू, बीड यांनी असे सांगितले की, या जन्मावर शतदा प्रेम करावे. आपले आरोग्य अबाधीत ठेवावे. अतिजोखमीच्या महिलांची व टि.जी.ची मोफत तपासणी करण्यासाठी जिल्हाभर आय.सी.टि.सी.केंद्र व उपचारासाठी ए.आर.टी. सेंटर, डि.एस.आर.सी. सेंटर वर आरोग्याबाबत मार्गदर्शन व उपचार मोफत उपलब्ध आहेत. सर्व सेवा- सुविधांचा पाठ पुरावा जिल्हा स्तरावर डापकू विभाग करतो.
उपस्थितांना मार्गदर्शन करतांना कविता नेरकर मॅडम अप्पर पोलिस अधिक्षक, अंबाजोगाई यांनी महिलांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, महिलांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. कुटूंब व्यवस्था अस्तित्वात आहेत. तेथून ते समाजाच्या प्रत्येक घटकाच्या त्या अन्यायाला बळी पडतात. शोषण सहन करतात. आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे. आपण आहोत म्हणून समाज आहे. कलकत्तामध्ये दूर्गादेवीची मूर्ती बनवण्यासाठी अतिजोखीम गटातील महिलांच्या अंगणातील माती वापरली जाते. आपली पुढची पिढीला अतिजोखमीच्या गटात येणार नाही. याची काळजी घेतली पाहिजे. आपल्या मुलांचे शोषण होणार नाही, याकडे लक्ष द्यावे. महिलांनी आपल्यावर येणा.या अनेक संकटाशी लढण्यासाठी एकत्रित आले पाहिजे, संघटीत झाले पाहिजे. आपला हक्क व न्याय मागीतला पाहिजे, यासाठी निश्चितच पोलिस प्रशासन आपल्या न्यायासाठी सोबत असेल.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापक बाळकृष्ण लुंगेकर, फारूखहुसेन सय्यद, समुपदेशक भिमा कांबळे, ओ.आर.डब्ल्यू. रेखा घाटे, पांचाळ किश्कींदा, तरकसे विमल, प्रियंका पोटभरे, लेखापाल अक्षय रामधामी, शेख अर्शिया पटेल, सरीता सुरवसे, शेख दिलशाद व सर्व पियरनी अथक परिश्रम घेतले.
