23 सप्टेंबर रोजी मुंबईत होणार पुरस्काराचे वितरण
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : जिल्ह्यातील यशस्वी बँक म्हणून ओळखल्या जाणार्या श्री गजानन नागरी सहकारी बँकेला दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स फेडरेशनकडून 100 कोटीपर्यंत ठेवी असलेल्या बँका या गटातुन दिला जाणारा महाराष्ट्र राज्यातुन प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्याच्या नागरी सहकारी बँकांच्या फेडरेशनमार्फत उत्कृष्ट काम करणार्या नागरी बँकाचा गौरव केला जातो.सन 2022 सालच्या ’सर्वोत्कृष्ट बँक’ पुरस्कारासाठी युनिट बँका व 100 कोटीपर्यंत ठेवी असलेल्या बँका या गटातुन श्री गजानन नागरी सहकारी बीडला प्रथम क्रमांकाच पुरस्कार मिळाला आहे. दि. 23 सप्टेंबर 2022 रोजी भारतीय क्रिडा मंदिर, वडाळा, मुंबई येथे पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
या पुर्वीही बँकेला सात वेगवेगळे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. हा आठवा पुरस्कार आहे. बीड जिल्हा दुष्काळी परिस्थिती व मंदीचे सावट तसेच कोरोना सारख्या आजाराचे सावट असतांना सुध्दा बँकेने रिझर्व्ह बँकेचे सर्व नॉर्मस् पुर्ण केले. बँकेचे अध्यक्ष माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे अमुल्य अभ्यासु मार्गदर्शन व बँकेचे उपाध्यक्ष प्रा.जगदीश काळे यांचे
योग्य नियोजन तसेच संचालक मंडळाची व बँक कर्मचार्यांची योग्य साथ.यामुळे बँकेची आर्थिक स्थिती गतवर्षी पेक्षा अधिक मजबुत झाली आहे.
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.आर. क्षीरसागर व सरव्यवस्थापक डॉ.एम.एस.शेख यांचे योग्य कार्यकुशल प्रशासन व नियोजन तसेच बँकेच्या प्रगतीमध्ये व्ही.एल. कुंबेफळकर (सहाय्यक व्यवस्थापक) यांनी व सर्वच कर्मचार्यांनी अमुल्य परिश्रम घेतले. म्हणूनच हा पुरस्कार बँकेस मिळाला आहे. सदर पुरस्कारा बाबत महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँकस् फेडरेशनचे पत्र मिळताच बँकेचे कर्मचारी वर्ग व सभासद, ठेवीदार, हितचिंतक आदींनी आनंद व्यक्त केला आहे.