‘आपली अंबाजोगाई हरित अंबाजोगाई’ उपक्रम
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : ‘आपली अंबाजोगाई हरित अंबाजोगाई’ उपक्रमांतर्गत अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय, नागनाथ परिसरात नदी किनारी शुक्रवारी (दि. 16) सकाळी एक हजाराहून अधिक बांबूच्या रोपांची लागवड करण्यात आली.

अंबाजोगाई शहर परिसरातील नैसर्गिक सौंदर्य वाढविण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय, नागनाथ परिसरात नदी किनारी बांबू लागवड संदर्भात नियोजन करण्यासाठी 14 सप्टेंबर रोजी बैठक बोलावली होती. या राष्ट्रीय कार्यक्रमात समर्पित भावनेने सहभागी होण्याचे आवाहन अंबाजोगाईच्या अप्पर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर यांनी केले होते. आज 16 सप्टेंबर रोजी नागनाथ परिसरात अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय अंबाजोगाई वनविभाग, सामाजिक वनीकरण विभाग, हरित अंबाजोगाई, रोटरी क्लब,जैन संघटना, न्यू व्हिजन शाळा, वसुंधरा प्रतिष्ठान, पेशवा संघटन यांच्या संयुक्त विद्यमाने नदी परिसरात एक हजारहून अधिक बांबूच्या रोपांची लागवड करण्यात आली.

या उपक्र मात हरित अंबाजोगाईच्या डॉ. शुभदा लोहिया, कमलेश परिधाडीया , अनंत मलवाड, अशोक सालपे, प्रा. तिवारी सर , शैलजा पवार, रेणुका गिरवलकर, गुरु दत्त तिवारी, प्रा.गिरीष कुलकर्णी, अजिंक्य कुलकर्णी, सुरज पवार, अजय जाधव, गौरव वाघमारे, गंगासागर बुरांडे, रत्नेश्वर वाघमारे, नागनाथ तोंडारे, दुर्गेश परदेशी, आकाश मोरे, अनिल काळे, नरेश उबाळे, पंडित चव्हाण, प्रा. कल्याण सावंत, विश्वजीत सोनवणे, रोहन कुलकर्णी, प्रा. पी.व्ही. कुलकर्णी, मुन्ना सोमाणी, गजानन बुरांडे, आनंद गणोरकर, धनराज राठोड, विशाल जगताप, प्रा. अभिजित लोहिया आदिसह 45 ते 50 स्वयंसेवकांनी उस्फूर्त व सक्रि य सहभाग नोंदवला. या रोपांना जगवण्याची जबाबदारी या संस्थांनी उचलली आहे.

You both are doing best work for saving earth but lot of person wants to connect with you just like me that’s why please when you have need then call me 09604349473