विराट मोर्चाने प्रशासनाला धडकी भरली
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : आवाज आमचा, साथ तुमची, बघता काय सामील व्हा या आर्द हाकेला साथ देते बीड मध्ये गुरूवारी (दि. 15 सप्टेंबर) रोजी आयोजित मोर्च्यात मुस्लिम महिलांनी हजारोच्या संख्येने उपस्थिती दर्शवली. किल्ला मैदान येथून रख रखत्या उन्हात निघालेला हा मोर्चा दुपारी एकच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन धडकला. संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चात हजारोच्या संख्येने महिलांची उपस्थिती पाहुन प्रशासनाला धडकी भरली. जिलाधिकारी यांच्यावतीने उपजिलाधिकारी यांनी आंदोलनस्थळी येत निवेदन स्वीकारले.
देशभरात अल्पसंख्यांक समाजाला या ना त्या कारणावरून टार्गेट केले जात आहे. मुस्लिम धर्माचे प्रेषित पैगंबर यांच्याबाबत अपशब्द काढून मुस्लिमांच्या भावना चिरडल्या जात आहेत. अखंड भारताच्या स्वातंत्र्य अमृत महोत्सवी वर्षात संविधानाला मुठमाती देत सरकार हत्या आणि बलात्कार करणा-यांची बाजू घेत त्यांची शिक्षा माफ करत आहेत. नुकतेच 15 ऑगस्ट रोजी गुजरात दंगा प्रकरणातील पीडीत बिलकिस बानो प्रकरणातील सर्व 11 आरोपींची शिक्षा माफ करीत त्यांना सोडून देण्यात आले.
आसाम मधील तीन मदरशांवर बुल्डोजर फिरविण्यात आले. आजान, हिजाब प्रकरणावरून देशात दोन समाजाची मने कलुषित करण्याचे प्रकार होत आहे. या व अन्य कारणावरून अल्पसंख्यांक समाजाला हेतु पुरस्सर टार्गेट केले जात आहे. केंद्र सरकार व अन्य राज्य सरकारांच्या मुस्लिम विरोधी धोरणाविरोधात महिलांचा संविधान बचाव मूक मोर्चा काढण्यात आला.
बीड शहरातील ऐतिहासिक किल्ला मैदान (जामा मस्जीद परिसर) येथे महिला मोठ्या संख्येने जमा झाल्या. हा मोर्चा किल्ला मैदान येथून निघून कारंजा रोड, राजुरीवेस, बशीरगंज, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोहचला. मुस्लिम महिलांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्यानंतर पाच विद्यार्थीनींनी मोर्चाला संबोधित केलं. भारत देश सर्व धर्मियांचा आहे, गंगा-जमुना तहजीबनं हा देश चालतो, संविधानाने चालतो. एक देश म्हणून बिल्किस बानो च्या आरोपींना शिक्षा व्हावी म्हणून आणि संविधान वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवं, असं यावेळी आंदोलनकर्त्या महिला म्हणाल्या.
या मागण्यांचे निवेदन सादर
गेल्या काही वर्षांपासून सर्वसमावेशक असलेल्या अखंड भारतात थेटपणे धर्मांध शक्ती आपल्या स्वार्थी कामांना अंजाम देण्याहेतू मुस्लिम समाजाला टार्गेट करत कधी लोकांवर हल्ले करतात तर कधी मुस्लिम धर्माचे सर्वस्व मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात अपमानजनक टिपणी करत आपली विकृती समाजासमोर आणतात. अशा लोकांविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी कायदा करा, बिल्किस बानो प्रकरणातील आरोपींची माफ केलेली शिक्षा रद्द करून त्यांना पुन्हा जेल मध्ये पाठवा, बलात्काराच्या घटनांना आळा घाला, बलात्काºयांना फाशी द्या, मुस्लिम धर्मगुरू मौलाना कलीम सिद्दीकी यांच्यावर लावण्यात आलेले आरोप मागे घेत त्यांची सुटका करा, आसाममध्ये होत असलेल्या मदरशाविरूद्ध कारवाई तात्काळ थांबवा, पाडलेले मदरसे पुन्हा बांधा, अल्पसंख्याक समाजावर होत असलेले हल्ले, अन्याय पाहता अॅट्रॉसिटीसारखा कायदा करा, अशा महत्वपुर्ण मागण्यांच निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
बीड शहरात आयोजित करण्यात आलेल्या या मोर्चाला मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलिसांनी मोठी खबरदारी घेतलेली होती. त्यामुळं आता गुजरात सरकारनं बिल्किस बानो प्रकरणातील आरोपींची सुटका केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
तालुकास्तरावरही निघाले मोर्चे
संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने बीड सह अंबाजोगाई, परळी, माजलगाव, आष्टी, पाटोदा, धारूर यासह अन्य ठिकाणीही नियोजनबध्द शांततेत मोर्चे काढण्यात आले. या मोर्चात तालुकास्तरावर तहसील कार्यालय व विभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चे काढून संबंधित अधिकाºयांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.