किल्ला मैदान येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार मोर्चा
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : बिलकीस बानो यांच्यावर अत्याचार करणाऱ्या व त्यांच्या नातेवाईकांची हत्या करणाऱ्या ११ जणांची केलेली सुटका रद्द करून त्यांना पुन्हा कठोर शिक्षा द्या, हजरत मोहम्मद (स .) यांच्याविषयी प्रत्येक वेळी अपमानाजनक टिप्पणी करणाऱ्यांविरूध्द कडक कारवाई करून त्यासाठी कायदा लागू करावा, भारतातील अल्पसंख्यांक समुदायावर होणाऱ्या अत्याचाराविरुध्द कडक कायदा करावा. या प्रमुख मागण्यांसाठी बीडमध्ये संविधान बचाव संघर्ष समितीच्या बतीने गुरुवार दि. १५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता किल्ला मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय महिलांचा भव्य निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे.
हक के लिए लढना तो बगावत नही होती अशी हाक देत महिलांनी एल्गार केला असून या निषेध मोर्चात महिला मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. बीडमध्ये संविधान बचाव संघर्ष समितीच्या बैठकीत महिलांचा भव्य निषेध मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. येत्या १५ सप्टेंबर रोजीच्या मोर्चाची तयारी युध्द पातळीवर सुरू असून किल्ला मैदान परिसरात सर्व महिला एकत्र आल्यानंतर किल्ला मैदान बलभीम चौक – कारंजा – बशीरगंज चौक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा नगररोड ते जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे.
या मोर्चात मोठ्या संख्येने महिला सहभागी होणार असल्याने विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत . विशेष म्हणजे या मोर्चाचे नियोजन देखील महिलांच्या नेतृत्वातच होणार आहे.