या सम्मेलनात सर्व धर्मीय बांधवांनी उपस्थित रहावे -मुफ्ती अब्दुल्ला कासमी
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : देशात सामाजिक एकता वृध्दींगत व्हावी, लोकांमध्ये प्रेमाचा संदेश पोहोचविण्याच्या उद्देशाने जमियत उलेमा-ए-हिंदच्यावतीने रविवारी (4 सप्टेंबर) रोजी बीड शहरात सद्भावना सम्मेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हाध्यक्ष मुफ्ती अब्दुल्ला साहेब कासमी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. या सम्मेलनात सर्व धर्मीय बांधवांनी मोठ्या संख्येने शामिल व्हावे असे आवाहन ही त्यांनी केले.
जमियत उलेमा-ए-हिंदच्या (Jamiat Ulema-e-Hind) सद्भावना मंच, बीडच्या वतीने आयोजित सद्भावना सम्मेलन विषयी माहिती देण्यासाठी येथील गोल्डन चॉइस हॉटेल सभागृहात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत मुफ्ती अब्दुल्ला साहेब कासमी यांनी ही माहिती दिली. मुफ्ती अब्दुल्ला म्हणाले की, जमीयत उलेमा-ए-हिंदच्यावतीने राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना महमूद मदनी यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शीरोड वरील गोल्डन चॉइस (आशिर्वाद लॉन्स समोर) येथे रविवारी दुपारी 12 वा. सद्भावना सम्मेलनात महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मौलाना हाफिज नदीम सिद्दीकी, श्री. भिक्खू धम्मशील, संजय लुथर गायकवाड, हभप महादेव महाराज चाकरवाडीकर, शिवचरित्रकार ज्ञानदेव काशिद आदिंची मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
मुफ्ती अब्दुल्ला कासमी म्हणाले ही, देशात कांही लोक धार्मिक तेढ निर्माण करून वातावरण दुषित करण्याचे काम करीत आहेत. मात्र, येथील सर्व धर्मिय नागरीक आज ही गुण्या गोविंदाने राहतात. जमीयत उलेमा-ए-हिंद विविध धर्म, संघटनांना सोबत घेउन देशाच्या समोर सकारात्मक संदेश देण्यासाठी देश पातळीवर सदभावना मंच स्थापन करून त्याद्वारे सद्भावना संमेलनाचे आयोजन करून राष्ट्रीय एकात्मता वृध्दींगत करण्याचे काम करीत आहे असेही म्हणाले. या पत्रकार परिषदेत मुजतबा अहेमद खान, काजी मुजिबुर्ररहमान, डीजी तांदळे, मौलाना साबेर रशिदी, हसीन अख्तर आदि उपस्थित होते.
सदरचे सम्मेलनासाठी मुफ्ती अब्दुल्ला साहेब कासमी, प्रा. सुशीलाताई मोराळे, मुजतबा अहेमद खान, राजकुमार कदम, डीजी तांदळे, हसीन अख्तर आदिंशी संपर्क करावा असे आवाहन ही करण्यात आले आहे.