जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जोरदार नारेबाजी ; येत्या 15 सप्टेंबरपासून गल्ली ते दिल्ली मोर्चे निघणार
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : आज गुरूवारी (1 सप्टेंबर) रोजी सकाळी 11 वाजता बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोदी-भाजपा चले जाव आंदोलन करण्यात आले. गुजरात दंगलीतल्या पीडितेला न्याय मिळवुन देण्यासाठी लोकसेना संघटनाने पुकारलेले आंदोलन पीडितेला न्याय मिळणार नाही तो पर्यंत सुरु राहणार असल्याचा इशारा लोकसेना प्रमुख अॅड. प्रा. इलियास इनामदार यांनी दिला आहे.
गुजरात दंगलीत बिलिकस बानो वर अमानुषण अत्याचार करण्यात आले. तसेच तिच्या तीन वर्षाच्या निरागस मुलीसह कुटुंबातील सात सदस्यांची अमानुषपणे हत्या आली होती. गुजरात सरकार व केंद्रीय गृह मंत्रालयाने या प्रकरणातील दोषी अकरा आरोपींची जन्मठेपेची शिक्षा माफ करु न त्यांना बरी करु न टाकले. या निर्णयाचा विरोध करु न 23 ऑगस्टला लोकसेनाने जिल्हाधिकारी बीड मार्फत राष्ट्रपतीसह भारत सरकार व गुजरात सरकारला इशारा निवेदन व 26 ऑगस्टला घरावर मोटरसायकलवर काळे झेन्डे लावून निषेध नोंदवला व या घटनेतील आरोपींची शिक्षा कायम ठेऊन त्यांची परत कारागृहात रवानगी करावी नसता एक सप्टेंबरला मोदी-भाजपा चले जाव आंदोलन करू असा इशारा लोकसेनाने सरकारला दिला होता. याच अनुषंगाने आज गुरूवारी (1 सप्टेंबर) रोजी सकाळी 11 वाजता बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात महिलांचा आदर करा, बेटी पढाओ बेटी बचाओ, सबका साथ सबका विकास म्हणणारे मोदी साहेब स्वत:च्या राज्यामध्ये स्वत: नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना ज्या मिहलेवर अत्याचार झाले पीडितेच्या डोळयासमोर तिच्या तीन वर्षाच्या मुलीला दगडावर आपटून ठार मारण्यात आले तिच्या परिवारातील सात लोकांची क्रुरपणे हत्या करण्यात आली. त्या पीडितेला पंतप्रधान असताना न्याय देतील का? असा सवाल ही चले जाव आंदोलन दरम्यान उपस्थित करण्यात आला. असल्याचे प्रा. इलियास इनामदार यांनी म्हटले आहे.
या आंदोलनात प्रा. इलियास इनामदार, जिल्हाध्यक्ष सुफियान मणियार, मिर्ज़ा खैसर बेग, अतीख अहमद खान, शेख अयाज़ अखतर, नदीम मेंबर, मोईन मास्टर, फारूक पटेल, शेख शफीक भाऊ, इलियास टेलर, शेख इकबाल, शाहेद पटेल, मूक्र मजान पठान, सादेकुज्जमा, नसीम इनामदार, मौलाना जफर काज़ी, प्रा. सविता शेटे, डॉ. गणेश ढवले, शेषेराव तांबे, अशोक हिंगे, प्रा. रफीक बागवान, पुष्पा तुरुकमारे, शाहनवाज़ खान, शेख मोहसिन, अॅड. सय्यद साजेद, अॅड. शेख अज़ीम, मुफ्ती वाजेद अशरफी, अय्यूब खान, शेख वज़ीर, समीर सरकार, मेजर अनुरथ वीर, खन्ना भैय्या, संतोष जोगदंड, जकेरिया सर, भैय्यासाहेब मोरे, शेख अखिल, अमजद पठान, डॉ. शेख नदीम, आफताब शेख, मिर्ज़ा अरबाज, सय्यद असद, शेख चिराग, नविद इनामदार, शेख जाफर, शेख यूनुस, शेख आखिब, शेख आमेर, जाफर इब्राहिम, शेख सोहेल, सलाम सेठ, हारून इनामदार, इलियास यूनुस, शेख जाकीर, आबेद कादरी, अमन शेख, सय्यद फारूक, शेख लाला, शेख रऊफ, बाबा भाई, सलीम खान, शेख अयाज़, शेख शप्पो इमरान जागीरदार शेख अज़हर व सर्व पक्ष-संघटनेचे नेते पदाधिकारी यांनी हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.
येत्या 15 सप्टेंबरपासून गल्ली ते दिल्ली मोर्चे निघणार
पीडीतेला न्याय मिळेपर्यंत जनतेच्या वतीने आंदोलन सुरु च राहणार आहे. येत्या 15 सप्टेम्बर पासून गल्ली पासून दिल्ली पर्यंत महिला मोर्चे निघणार आहे व सुरु वात बीडपासून संविधान बचाव संघर्ष समिती बीडच्या वतीने देशातला पहिला मोर्चा निघेल अशी गर्जना आजच्या चले जाव आंदोलनामध्ये करण्यात आली आहे.