मुख्याधिकारी यांच्या आश्वासनानंतर आंदोलन तूर्तास मागे
By MahaTimes ऑनलाइन |
बीड शहरातील विविध प्रश्नाबाबत आम आदमी पार्टीच्या बीड नगरपालिकेवर मोर्चा व ठिय्या आंदोलन करण्यात आले. मा. मुख्याधिकारी नगरपरिषद बीड यांनी स्वतः येऊन पाहणी करतो व तेथील जे काही प्रश्न असतील तात्काळ मार्गे लावतो अशा आश्वासनानंतर आंदोलन तूर्तास मागे घेण्यात आले.
बीड हा मोर्चा बीड येथील तेलगाव नाका बार्शी नाका शिवराज पान सेंटर छत्रपती शिवाजी महाराज चौक छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण या मार्गे बीड नगरपालिकेवरती धडकला आम आदमी पार्टीच्या वतीने गेल्या काही वर्षापासून बीड शहरातील विविध भागातील विविध प्रश्नाबाबत लोकशाही मार्गाने निवेदन देत आहे. मात्र, आपण नगरपरिषद प्रशासनाकडून निवेदनाच्या माध्यमाने केलेल्या मागण्याकडे कानाडोळा केला आहे या सर्व समस्या बीड नगर परिषदेने सोडवणे आवश्यक आहे आपण आपले नगरपरिषद प्रशासन या मागण्याकडे सातत्याने दुर्लक्ष करत आहे. आम्ही आपणास सर्व निवेदनाच्या प्रति सह सर्व मागण्या सोडवण्यासाठी हे निवेदन देत असून आपण याकडे कसल्याही प्रकारचे लक्ष दिलेले नाही म्हणून आम आदमी पार्टी व तेथील नागरिकांना सोबत घेऊन आज तेलगाव नाका ते बीड नगरपरिषद बीड पर्यत दि. 29 ऑगस्ट 2022 या दिवशी जिल्हाध्यक्ष अशोक येडे यांच्या मार्गदर्शनाखाली व शहर अध्यक्ष सय्यद सादेक यांच्या नेतृत्वात हा मोर्चा सर्व प्रश्न सोडण्यासाठी आपल्या मुख्य अधिकारी नगर परिषद कार्यालय बीड मोर्चा व ठिय्या आंदोलन करण्यात आले. मुख्याधिकारी नगरपरिषद बीड यांनी स्वतः येऊन पाहणी करून प्रश्न मार्गी लावतो असे आश्वासन दिले
यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक येडे, अक्रम शेख, रामधन जमाले, प्रा.ज्ञानेश्वर राऊत, सय्यद सादेक, मिलिंद पाळणे, सचिन कुठे, आजम खान, नीता बाई हजारे, हमीदा कुरेशी, शेख सुलताना, आयेशा राणी, शायद कुरेशी, ज्ञानेश्वर शिंदे, शेख सद्दाम, अजीम शेख, पठाण इरफान, सादिक शेख, पठाण मकसूद, शेख अक्रम, शेख बिलकिस, पठाण रूकसाना, शेख रफिक, सय्यद दौलत आदी उपस्थित होते.