नागरिक चांगलेच धास्तावले; अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : शहरातील बार्शी रोड भागातील जे.के. कॉम्प्लेक्स पाठीमागील रशिदीया कॉलनीत अज्ञात व्यक्ती ने दारासमोर उभी मोटारसायकल पेटवून दिली. ही घटना रविवारी(दि. 21) रोजी पहाटे पौने तीन वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत मोटारसायकल पूर्णत: जळून खाक झाली. या गंभीर प्रकाराने नागरिक चांगलेच धास्तावले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, औषध कंपनीचे प्रतिनिधी (एम.आर.) शेख अजिमोद्दीन शेख जहुरोद्दीन (वय 36) हे रशिदीया कॉलनीत वास्तव्यास आहे. शनिवारी रात्रि नेहमी सारखे कामावरून परत आल्यावर घरासमोर मोटरसायकल (एम.एच. 23 ए.एच. 4939) उभी करून झोपी गेले. रविवारी पहाटे पौनेतीन वाजण्याच्या सुमारास मोटासायकलवरून आलेल्या अज्ञात व्यक्ती ने शेख अजिमोद्दीन यांच्या मोटासायकलला कशा ने तरी आग लावुन पेटवून दिले. या घटनेत मोटासायकल पूर्णपणे जळून खाक झाली. या घटनेत शेख यांचे हजारो रूपयाचे नुकसान झाले. मोटारसायकल जळत असतांना त्याच्या ज्वाला अचानक भडकल्या व स्फोटासारखा आवाज आल्याने शेख अजिमोद्दीन व घरातील सदस्य बाहेर आले आणि पानी टाकुन आग विझविली. शेजारचे लोक ही आवाजाने जागे झाले. अज्ञात दोन व्यक्ती मोटारसायकलवरून आले आणि त्यापैकी एकाने जळता टेंभा घेउन आग लावली. याप्रकरणी पेठ बीड ठाण्यात गुरनं 177/2022 कलम 435 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.
कॉलनीत दहशत, रात्रिची झोप उडाली
सदरची घटना होऊन आज चार दिवसाचा कालावधी लोटला आहे. मात्र, येथील रहिवाशांची रात्रीची झोप उडाली आहे. विशेषता महिलांनी सदरील घटनेची धास्ती घेतली आहे. लोक रात्र अक्षरश: रात्र जागून काढत आहेत. सदरची घटना रशिदीया कॉलनीतील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असल्याचे शेख अजिमोद्दीन यांनी सांगितले. सदरचा गुन्हा करणारा सराईत गुन्हेगार असावा. त्यानेच हे सर्व प्रकार केले असावेत असा नागरीकांनी अंदाज वर्तविला आहे. रात्रिची गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे.
यापूर्वीही दोन मोटरसायकिली चोरीस, सीसीटीव्ही कॅमेरा फोडला
मागील एप्रिल महिण्यात अज्ञात व्यक्ती ने रशिदीया कॉलनीतुन दोन मोटारसायकिली लंपास केल्याची घटना घडली होती. मात्र, सदर नागरिकांनी नशीबाला दोष देत तक्रार दाखल केली नाही. मात्र मोटारसायकल चोरी झाल्यानंतर आरोपीस सदरची घटना शेजारील घराच्या सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाल्याचा संशय आल्याने त्याने घटनेच्या आठवडाभरात तोंडाला कापड गुंडाळुन येत कॅमेराच्या नासधुस केली होती. या घटनेनंतर जवळपास तीन महिन्यांनी मोटारसायकल जाळल्याचा गंभीर प्रकार घडल्याने नागरिक चांगलेच धास्तावले आहेत.