By MahaTimes ऑनलाइन |
बीड : उर्दू दैनिक एशिया एक्सप्रेस चे बीड जिल्हा प्रतिनिधी रईसखान नासेरखान पठाण यांचे सोमवारी सकाळी 8 वाजता हृदयविकाराच्या धक्क्याने झाले. ते 43 वर्षाचे होते. पठाण यांच्या निधनामुळे पत्रकारितेतील एक तारा निखळला असून, न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.
एक शांत संयमी, मितभाषी स्वभावाचे रईसखान पठाण किल्ले धारूर येथील रहिवाशी होते. पत्रकारिते बरोबरच ते येथील इंदिरा गांधी उर्दू माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे शिक्षक म्हणून कार्यरत हैं. पत्रकारिता व ज्ञानदानाबरोबरच शेर शायरी लिहित असत या माध्यमातुन त्यांना रईसखान फतेहबादी या नावाने ही ओळखले जाउ लागले.
मागील कांही महिण्यापूर्वी त्यांना ह्दयविकाराचा झटका आल्याने त्यांच्यावर एंजोप्लाष्टी करण्यात आली होती. मात्र त्यानंतर प्रकृती मध्यंतरी ठीक झाली होती. आज सोमवारी पहाटे छातीत अचानक दुखु लागल्याने त्यांना बीड शहरातील एका खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला व त्यातच त्यांची प्राणज्योत मावळली.
रईसखान यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण धारु र येथील नामांकित मिल्लिया उर्दू शाळेत तर उच्चशिक्षण औरंगाबादच्या मौलाना आझाद महाविद्यालयात झाले. त्यांनी उर्दू पत्रकारितेत आपली वेगळी छाप निर्माण केली होती. अतिशय प्रतिकुल परिस्थितीतुन त्यांनी पत्रकारिता करीत शिक्षक बनन्याचे स्वप्न साकार केले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी व दोन मुले, आई, वडील, भाऊ -बहीन असा परिवार आहे. त्यांचा दफनविधी आज रात्री बीड येथील इस्लामपुरा परिसरातील बारादरी कब्रस्तान येथे करण्यात येणार आहे. पठाण परिवाराच्या दु:खात ‘महा टाईम्स’ परिवार सहभागी आहे.