बीड अस्थीरोग संघटनेच्या कार्याचे कौतुक
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : बीड अस्थिरोग तज्ञ संघटना च्या वतीने महाराष्ट्र अस्थिरोग तज्ञ संघटनेच्या सहकार्याने बीड येथे 21 ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय अस्थिरोग तज्ञ परिषद संपन्न झाली. महाराष्ट्र अस्थीरोग संघटनेचे अध्यक्ष डॉ. वासुदेव गाडेगोणे ( चंद्रपूर ), राज्य सचिव डॉ. नारायण कर्णे (पुणे ), डॉ. बी शिवशंकर ( सोलापूर ), डॉ. विजय काकतकर ( नाशिक ), डॉ. गिरीश मोटवानी ( नागपूर ) इत्यादी मान्यवर ज्येष्ठ अस्थिरोग तज्ञ यांचे मार्गदर्शन लाभले.
उद्घाटन प्रसंगी बोलताना डॉ. शिवशंकर यांनी बीड अस्थी रोग संघटना योग्य रीतीने काम करत असून नेहमी राज्यभरात अग्रेसर असते असे प्रतिपादन केले. डॉ. गाडेगोणे यांनी महाराष्ट्र अस्थिरोग संघटनेतर्फे चालू असलेल्या उपक्रमाची माहिती तसेच बीड अस्थीरोग संघटने च्या कार्याचे कौतुक केले. सचिव डॉ. नारायण कर्णे यांनी बीड अस्थीरोग संघटना ही राज्यभरातील अग्रेसर संघटना असून दोन वेळा राज्यस्तरीय पुरस्कार जिंकून त्यांनी कर्तृत्व सिद्ध केले आहे असे सांगितले. डॉ. विजय काकतकर यांनी बीड अस्थीरोग संघटना च्या स्थापनेपासून ते आजतागायत विविध विषयावर मार्गदर्शन केल्याचे नमूद केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. बीड अस्थिरोग संघटना नेहमीच अस्थिरोग तज्ञ साठी विविध शिबिरे, वर्कशॉप, सेमिनार आयोजित करत असते. सामाजिक उपक्रम देखील राबवले जातात असे बीड अस्थीरोग संघटनेचे डॉ. प्रमोद शिंदे यांनी सांगितले.
या परिषदेस सर्व डॉक्टरांचे मार्गदर्शन लाभले. नवनवीन शस्त्रक्रिया उपचार पद्धती व सर्जिकल वर्कशॉप या माध्यमातून अस्थिरोग तज्ञ ना मार्गदर्शन करण्यात आले. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमधून अनेक अस्थिरोग तज्ञ उपस्थित होते. महाराष्ट्र अस्थीरोग संघटनेचे राज्य उपाध्यक्ष डॉ. प्रमोद शिंदे, आयर्न मॅन डॉ. आनंद वैद्य, तसेच इतर मान्यवरांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. डॉ.प्रवीण देशमुख, डॉ.सुरेश मुंढे, डॉ. टी एल देशमुख, डॉ. पि.यन. धायतडक, डॉ. विठ्ठल क्षीरसागर, डॉ. राजेंद्र भोरे, डॉ. मधुसूदन काळे, डॉ. अंशुमन बहिर, डॉ अळणे एस एल, डॉ अभिनव जाधव, .डॉ.गवते विश्वास,डॉ.अमोल गीते, डॉ.गणेश देशमुख, डॉ.लामतुरे, डॉ.यादव आणि सर्व अस्थिरोग तज्ञ यावेळी उपस्थित होते. ही परिषद यशस्वी करण्यासाठी बीड अस्थीरोग संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण देशमुख, सचिव डॉ. सुरेश मुंडे, सर्व कार्यकारणी सदस्य आणि बीड जिल्ह्यातील अस्थीरोग संघटना सदस्य यांनी प्रयत्न केले.