शल्यचिकीत्सक डॉ. साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली अवघड शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली
By MahaTimes ऑनलाइन |
जिल्हा रुग्णालयात आज रोजी एका 63 वर्षीय रुग्णावर प्रथमच स्पाइन ची अत्यंत अवघड शस्त्रक्रिया जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुरेश साबळे यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली यशस्वी पार पडली.

हारुण अहमद सय्यद ह्या रुग्णास पाठ दुखी, पायात ताकद कमी, मुंग्या येणे आदी तक्रारी होत्या. एमआरआय मधे दोन्ही मणक्यामधली डिस्क घसरलेली होती व नस दबलेली होती. शस्त्रक्रिया 5 तास चालली. सकाळी 11 वाजता चालु झालेली शस्त्रक्रिया दुपारी 4 वाजता पार पडली.
हि शस्त्रक्रिया खाजगी रुग्णालयात किमान रु. 2 ते 2.5 लाख खर्च अपेक्षित असतो. ही शस्त्रक्रिया जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुरेश साबळे यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली डाॅ. विजय कट्टे, डॉ कदम व भुलतज्ञ डाॅ सोमनाथ वाघमारे, डाॅ चव्हाण यांनी यशस्वी केली. यावेळी भिसे ब्रदर, घुले ब्रदर माळी मामा यानी परिश्रम घेतले.
तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे हितावह
फॅमिली डॉक्टरांकडून किंवा अन्य तात्पुरत्या औषधांनी रुग्णास आराम मिळाला नाही, की तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतला जातो. अशावेळी आता तज्ज्ञांकडे गेले, की ते शस्त्रक्रिया सांगणारच या भीतीने बहुतांश रुग्ण तज्ज्ञाचा सल्ला घेणे टाळतात किंवा दिरंगाई करतात. अनेकदा वेळीच उपचार घेतले नाहीत, तर गंभीर स्वरूपाचे आणि घातक दीर्घकालीन परिणाम घडू शकतात. गरज असताना शस्त्रक्रिया करायचीच नाही, या अट्टहासामुळे काहीवेळी रुग्णास कायमस्वरूपाचे गंभीर धोके होऊ शकतात. मुख्यतः नसांवरील दाब हा दीर्घकालीन आणि घातक स्वरूपाचा असेल, तर हातापायातील ताकदीवर, मलमूत्र विसर्जनाच्या नियंत्रणावर त्याचा परिणाम होऊ शकतो; पण लक्षणे अधिक गंभीर नसतील, तर डॉक्टर शस्त्रक्रिया विना उपचारही सांगतात.