‘शिवसंग्राम’च्या जिल्हा कार्यकारीणी बैठकीत एकमत
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : शिवसंग्राम जिल्हा कार्यकारीणीची बैठक गुरूवार, 18 ऑगस्ट रोजी सकाळी 11.00 वा. संपन्न झाली. बैठकीच्या सुरूवातीला स्व. विनायकरावजी मेटे साहेब यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी भारतीय संग्राम परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे हे होते. पक्षाला समर्थ नेतृत्वाची गरज पाहता श्रीमती डॉ . ज्योतीताई विनायक मेटे यांनी शिवसंग्राम पक्ष संघटनेच्या नेतृत्वाची धुरा स्वत:च्या खांदयावर घेवुन संपूर्ण पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे नेतृत्व करावे संघटनेला वळ प्राप्त होण्यासाठी हे पाऊल उचलने आवश्यक आहे. असा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला .

या बैठकीस शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष नारायण काशिद, जिल्हा सरचिटणीस अनिल घुमरे, सुहास पाटील, जिल्हा उपाध्यक्ष किसन कदम, रामदास नाईकवाडे, जिल्हा सरचिटणीस सुनिल आरसुळ, ओबीसी आघाडीचे लक्ष्मण ढवळे, अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष पठाण फेरोज खान, सामाजिक न्यायाचे जिल्हाध्यक्ष सुनिल शिंदे, ऊसतोड कामगार नेते बबन माने, गेवराईचे तालुकाध्यक्ष कैलास माने व इतर जिल्हा कार्यकारीणीचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
सदर बैठकीत खालील ठराव घेण्यात आले. स्व . मा.आ. विनायकरावजी मेटे साहेब यांचा अस्थीकलश संपूर्ण बीड जिल्हयात सर्वसामान्य नागरीकांच्या दर्शनासाठी यात्रा काढण्याचा या वेळी निर्धार करण्यात आला. सदरची अस्थिकलश यात्रा शुक्रवार दि.19 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट 2022 पर्यंत जिल्हयातील सर्व तालुका, महत्वाची शहरे व गावाच्या ठिकाणी दर्शनासाठी ठेवण्यात येईल. या यात्रेची सुरूवात शुक्रवार, दि.19 ऑगस्ट रोजी ठिक 9.00 वा. शिवसंग्राम भवन नगर रोड, बीड येथुन होईल यात्रेचे विर्सजन श्री क्षेत्र पैठण जि. औरंगाबाद या ठिकाणी मंगळवार दि. 23 ऑगस्ट रोजी होईल. सदर यात्रेमध्ये अस्थिकलेशाचे चार रथ सामील होतील तसेच श्रीमती डॉ. ज्योतीताई विनायकराव मेटे यांनी पक्ष नेतृत्वाची धुरा सांभाळणे या बाबत बैठकीत विचार विनिमय करण्यात आला.
स्व . मा . आ . विनायकरावजी मेटे साहेब यांच्या निधनाने संपूर्ण शिवसंग्राम व भारतीय संग्राम परिषदेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यामध्ये शोककळा पसरलेली आहे. सर्वांना याचे अतोनात दु : ख झाले आहे. परंतु या दु : खातुन सावरण्यासाठी व स्व . विनायकरावजी मेटे साहेबांनी घेतलेला वसा व वारसा समर्थपणे चालवण्यासाठी तसेच स्व. मा. आ. विनायकरावजी मेटे साहेबांनी ज्या प्रश्नासाठी आयुष्यभर संघर्ष केला असे प्रश्न अजुनही प्रलंबीत आहेत. या पैकी मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य संघर्ष केला तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे आरबी समुद्रातील भव्य स्मारक निर्माण करणे हे त्यांचे स्वप्न होते या बाबींची पूर्तता करण्यासाठी संघटनेला व पक्षाला समर्थ नेतृत्वाची गरज असल्यामुळे श्रीमती डॉ . ज्योतीताई विनायक मेटे यांनी शिवसंग्राम पक्ष संघटनेच्या नेतृत्वाची धुरा स्वत:च्या खांदयावर घेवुन संपूर्ण पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे नेतृत्व करावे असा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.

श्रीमती डॉ . ज्योतीताई विनायकराव मेटे यांना मा . राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यत्व देणे बाबत बैठकीत मागणी झाली. या बैठकी दरम्याण उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्व . मा.आ. विनायकरावजी मेटे साहेब व त्यांची पक्ष संघटना गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा घटक पक्ष म्हणुन समर्थपणे वाटचाल करत आहे व वेळोवेळी भारतीय जनात पक्षाला अनेक मार्गाने बळ देण्याचे काम करत आहे. मा. राज्यपाल महोदय नियुक्त 12 विधान परिषदेच्या जागा नियुक्त करण्यात येणार आहेत. या जागेवरती स्व. मा.आ. विनायकरावजी मेटे साहेबांना नियुक्ती देण्याचा शब्द भारतीय जनता पक्ष व उपमुख्यमंत्री मा. ना. देवेंद्रजी फडणवीस यांनी अनेक वेळा देलेला आहे. आता विनायकराव मेटे यांची जागा त्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती डॉ. ज्योतीताई विनायकराव मेटे यांना देण्यात यावी त्यांची विधान परिषद सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात यावी. व स्व. विनायकरावजी मेटे साहेबांनी केलेल्या कामांची पावती म्हणुन सदरील नियुक्ती देण्यात आल्यास शिवसंग्रामच्या लाखो पदाधिकारी कार्यकर्त्यांना न्याय मिळाल्याची भावना जनमानसात तयार होईल असे मत ही प्रभाकर कोलंगडे, नारायण काशिद व शिवसंग्रामचे उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी व्यक्त केले .
या बैठकीस योगेश शेळके, विनोद कवडे , मनोज जाधव, किसन कदम, अॅड. राहुल मस्के, कैलास शेजाळ, सुनिल आरसुळ, राजेंद्र आमटे, अॅड. मनिषा कुपकर, पठाण फेरोज खान, सुनिल शिंदे, अक्षय माने, दशरथ मोरे, बबन माने, पंडित शेंडगे, शिवराम शिरगिरे हे उपस्थित होते.
