रुग्णांसाठी माफक दरात सुविधा उपलब्ध असणार
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सामाजिक बांधीलकी म्हणून सायं. दै. बीड ‘सिटीझन’च्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे, तहसीलदार सुहास हजारे, शहर ठाण्याचे पो. नि. रवि सानप यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जेष्ठ समाजसेवक मोईन मास्टर, फारूक पटेल, अमर नाईकवाडे, सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे, मुखीद लाला, शेख अमर, गणेश तांदळे, शेख चिलाल, सय्यद असरार, अशपाक इनामदार, अय्युब पठाण, शेख खमर, शेख अखील, रोहिल दादा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष रेहाना पठाण, वाघमारे ताई यांची प्रमुख उपस्थिती होती.
सायं. दै. बीड सिटीझनच्या वतीने लोकार्पण करण्यात आलेल्या रूग्ण वाहिकेच्या माध्यमातुन रुग्णांसाठी माफक दरात सुविधा उपलब्ध असणार आहे. यावेळी सिटीझन परिवाराच्या वतीने मान्यवरांचे स्वागत संपादक शेख मुजीब, चंदन पठाण, रफीक पठाण, शेख वसीम, शेख तालेब, देवेंद्र ढाका, अनिल ससाणे, विक्रांत बीर, सय्यद अर्शद, संदीप जगदाळे, कृष्णा फरताळे, योगेश नाईक, उबेद मोमीन, तौकीर मोमीन, नाहेद बागवान, शेख राजु शेख आमेर, जावेद खान, फारूक खान, अय्युब शहा, चालक मुनीरभाई आदिंनी केले.