बीडमध्ये खा.प्रितमताईंच्या उपस्थितीत शनिवारी होणाऱ्या तिरंगा रॅलीत सहभागी व्हा – सलीम जहाँगीर
By MahaTimes ऑनलाइन |
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी ( दि.13 ) बीड शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. देशात सर्वत्र स्वातंत्र्याची पंचाहत्तरी मोठ्या उत्साहात साजरी होत असून राष्ट्र प्रेमापोटी भाजप नेते सलीम जहाँगीर यांनी तब्बल 262 फुटाचा तिरंगा ध्वज बनविला असून खा. प्रितमताईंच्या उपस्थितीत होणाऱ्या रॅलीत हे विशेष आकर्षण ठरणार आहे. या ऐतिहासिक तिरंगा रॅलीचे साक्षीदार होण्यासाठी बीडकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन भाजप नेते सलीम जहाँगीर यांनी केले आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित तिरंगा रॅली बीड शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथून सकाळी नऊ वाजता सुरू होणार आहे, शहरातील माळी वेस-धोंडीपुरा-बलभीम चौक-राजुरी वेस-छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गे रॅली निघणार असून सामाजिक न्याय भवन,नगर रोड येथे समारोप होणार आहे.
राष्ट्र प्रेमापोटी भाजप नेते सलीम जहाँगीर यांनी तब्बल 262 फुटाचा तिरंगा ध्वज बनविला असून खा. प्रितमताईंच्या उपस्थितीत होणाऱ्या रॅलीत हे विशेष आकर्षण ठरणार आहे.या तिरंगा रॅलीत बीड शहरातील सर्व जाती धर्मातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्ष साजरे करावे असे आवाहन भाजप नेते सलीम जहाँगीर यांनी केले आहे.