नरेगामधून होत असलेल्या कामाचे केले कौतुक
By MahaTimes ऑनलाइन |
बीड तालुक्यातील नांदुर हवेली ग्रामपंचायतीच्या कामास बुधवारी विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी थेट भेट देत पहाणी केली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, तहसिलदार सुहास हजारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर मोकाटे, अनिरु द्ध सानप आदि उपस्थित होते.
नांदूर हवेली ग्रामपंचायतीच्या इमारतीचे काम रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. अशा प्रकारे रोजगार हमी योजनेतून ग्रामपंचायतीचे बांधकाम करणारी नांदुर हेवली ग्रामपंचायत ही एकमेव आहे. औरंगाबादचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर हे बुधवारी बीड दौऱ्यावर होते त्यावेळी त्यांनी ग्रामपंचायतीस भेट देऊन कामाची पहाणी केली. त्यांची कामाचे कौतुक केले. दरम्यान श्री. केंद्रेकर यांनी ग्रामपंचायतीने तयार केलेली स्मशानभूमी व त्याकडे जाणारा रस्ता याचीही पहाणी केली. यावेळी केंद्रेकर व इतर अधिकार्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यापूर्वीही केंद्रेकर यांनी अतिवृष्टीने बाधित भागाची पाहणी करताना नांदुर हवेली गावाला भेट दिली होती. त्यावेळची स्थिती आणि आता झालेला बदल पाहून केंद्रेकर यांनी गावाच्या विकासाबाबत समाधान व्यक्त केले.
यावेळी राष्ट्रवादीचे युवा नेते शाहेद पटेल यांच्यासह सरपंच संताबाई सुभाष बुधनर, ग्रामसेवक अशोक नागरगोजे ,गंगाभाऊ बुधनर, दत्ता तिपाले, मुनीर शेख, नानाभाऊ बुधनर, रिजवान पठाण, गणेश बुधनर, नाना हुंबरे, लक्ष्मण बुधनर, माणिक बुधनर, भरत बुधनर, पंडित बुधनर, रामदास बुधनर, रज्जाक शेख, सोहेल पटेल, सुभाष बुधनर, फारुख शेख, ख्वाजा शेख, अनिल बुधनर, राजू शेख, जमील शेख, शाकेर शेख, बंडू बुधनर, श्याम लकडे, पवन बुधनर, रियाज शेख, मुजीब शेख, शेषनारायण बुधनर, बाबुलाल हरनळ, अशोक बुधनर, गणेश हाराळे, विठ्ठल बुधनर, कल्याण बुधनर, भागवत बुधनर, शंकर बुधनर, कठ्ठू शेख, मुबीन शेख, खालेद सय्यद, अहमद सय्यद, राजाभाऊ बुधनर व गावकरी उपस्थित होते.
विकासाबाबत शाहेद पटेल यांचा पुढाकार, केंद्रेकर यांनी केले कौतुक
शाहेद पटेल यांचा पुढाकार नांदुर हवेली ग्रामपंचायतीच्या बांधकामासाठी व स्मशानभूमी आणि स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचा प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादीचे युवा नेते शाहेद पटेल यांनी पुढाकार घेतला होता. त्यांनी पाठपुरावा करु न ही कामे मंजूर करु न घेतली. ग्रामपंचायतीचे काम रोजगार हमी योजनेतून करण्याचा प्रयोग त्यांनी केला. याबद्दल केंद्रेकर यांनी त्यांचेही कौतुक केले.