बीडच्या महिलांना प्रेरणा देण्यासाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन – डॉ.सारिका क्षीरसागर
By MahaTimes ऑनलाइन |
‘प्राईड अँड पॉवर एक्स्पो’ महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ आहे. बीडच्या महिलांच्या पंखात बळ देण्याचे कार्य क्षीरसागर कुटुंबीयांनी केले. महिलांना त्यांच्या व्यवसायासाठी हक्काचे व्यासपीठ आणि मार्केट निर्माण करून दिले तसेच डॉ. दीपाताई क्षीरसागर आणि डॉ. सारिकाताई क्षीरसागर यांनी कल्पतरूच्या माध्यमातून महिलांचे स्वप्न साकार करत त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी योगदान मोलाचे आहे असे प्रतिपादन अभिनेत्री शिवाली परब यांनी केले.

येथील कल्पतरू बीड आयोजित प्राईड अँड पॉवरएक्स्पो या प्रदर्शन सोहळयाचे महिलांच्या प्रचंड गर्दीत उदघाटन महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम शिवाली परब यांच्या हस्ते थाटात संपन्न झाले. यावेळी युवानेते डॉ.योगेश क्षीरसागर, कल्पतरू बीडच्या अध्यक्ष प्राचार्य डॉ.दीपा क्षीरसागर, सचिव डॉ.सारिका क्षीरसागर यांची उपस्थिती होती.

बीड शहरातील आणि पंचक्रोशीतील महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये वाढ करून त्यांना जगाची बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याने, बीडच्या महिलांना प्रेरणा देण्यासाठी म्हणून या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे असे प्रतिपादन प्रास्ताविकामध्ये डॉ.सारिका क्षीरसागर यांनी केले.
डॉ.योगेश क्षीरसागर म्हणाले की, बीडच्या महिलांसाठी भव्य दिव्य प्राईड अँड पॉवर एक्स्पो आयोजित करून महिलांना बळ देण्यासाठी, बीडच्या कलाकृती, वेगवेगळे प्रोडक्ट जगात पोहोचवणार असून त्यासाठी ही आज सुरुवात आहे. असेच प्रदर्शन दरवर्षी भरवून महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी त्यांना व्यासपीठ देणार असल्याचे प्रतिपादन डॉ.योगेश यांनी केले.

यावेळी फॅशन, ब्युटी, कपडे, गृहउपयोगी साहित्य, ज्वेलरी, खाद्यपदार्थ यांचे स्टोल लावण्यात आले असून लहान मुलांना खेळण्यासाठी आकर्षक खेळणी देखील उपलब्ध करून देण्यात आली होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रमुख व्यवस्थापक रविराज जेधे, नाट्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.संजय पाटील देवळाणकर, डॉ.सतीश माऊलगे, डॉ.अनिता शिंदे, मिलींद शिवणीकर, यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी शहरातील व पंचक्रोशीतील महिला, महाविद्यालयीन कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रा. दुष्यंता रामटेके यांनी केले.
