प्रभारी डॉ. सुरेश साबळे यांची संस्मरणीय कारकीर्द
By MahaTimes ऑनलाइन
बीड : जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून डॉ.सतिष दयाराम सूर्यवंशी यांची नियुक्तीचे आदेश राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने शुक्रवारी काढले.
प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून डॉ . सुरेश साबळे यांनी जिल्हा रुग्णालयात चांगले काम केले. बीडचे जिल्हाशल्य चिकित्सक डॉ . सूर्यकांत गित्ते यांची बदली झाल्यापासून हे पद रिक्त होते. यापदाचा अतिरिक्त पदभार माजलगावचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश साबळे यांच्याकडे होता. त्यांनी मागच्या वर्षभरात जिल्हा रुग्णालगत मोठे बदल केले. कोरोनाच्या लाटेतून जिल्हयाला सांभाळतानाच सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुरळीत करण्याचे मोठे आव्हान त्यांनी पेलले. कोरोना योद्धा म्हणून नाव लौकिक मिळवला.
जिल्हा शल्य चिकित्सक काय असतो हे कोरोना योद्धा साबळे यांनी दाखवून दिले. बीड जिल्हा रुग्णालयाच्या प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक पदावर डॉ . सुरेश साबळे यांनी चांगले काम करत, रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी विशेष पुढाकार घेतला होता. त्यांच्या जागी आता नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक असलेले डॉ. सतीष सूर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.