By MahaTimes ऑनलाइन | औरंगाबाद
शहरातील बालेपीर भागात झालेल्या एका प्रकरणात दाखल असलेल्या गुन्ह्यात भाजप नेते शेख ईरशाद यांच्यासह तिघांना औरंगाबाद हायकोर्टाने आज जामीन मंजूर केला.

या प्रकरणाची माहिती अशी, बीड शहरातील एका प्रकरणात भाजप नेते शेख ईरशाद यांच्यासह 6 जणांविरूध्द कलम 307 सह इतर कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अॅड. सिध्देश्वर ठोंबरे यांच्यामार्फत जामीनासाठी अर्ज दाखल केला होता.
त्यावर आज मा. न्यायालयाने भाजप नेते शेख ईरशाद अब्दुल रज्जाक यांच्यासह शेख वसीम अब्दुल रज्जाक, शेख असलम अब्दुल रज्जाक या तिघांनाही जामीन मंजूर केला आहे. शेख यांच्या वतीने अॅड. सिध्देश्वर ठोंबरे यांनी बाजू मांडली.
