कल्पतरू बीड तर्फे 31 जुलै रोजी सौ. केएसके महाविद्यालय परिसरात होणार नृत्य स्पर्धा
By MahaTimes ऑनलाइन | बीड
येथील कल्पतरू बीड तर्फे घेण्यात येणाऱ्या ‘नृत्यविष्कार महिलांचा’ या कार्यक्रमास नृत्य स्पर्धेसाठी अभिनेत्री अनुष्का सरकटे उपस्थित राहणार असल्याची माहिती कल्पतरूच्या अध्यक्ष प्राचार्य डॉ. दीपा क्षीरसागर यांनी दिली आहे.

दि.31 जुलै रोजी सौ. के. एस. के. महाविद्यालयाच्या परिसरात दुपारी चार वाजता होणाऱ्या ‘नृत्यविष्कार महिलांचा’ या भव्य-दिव्य नृत्य स्पर्धेसाठी कारभारी लय भारी फेम अभिनेत्री अनुष्का संजय सरकटे उपस्थित राहून पारितोषिके वितरित करणार आहे. बीड येथील कल्पतरू या संस्थेतर्फे ही स्पर्धा दोन गटात होणार असून वैवाहिक महिला व आई मुलगा/ मुलगी असे दोन गट असणार आहे. प्रथम ,द्वितीय, तृतीय, उत्तेजनार्थ असे पारितोषिके असणार आहे.
अनुष्का सरकटे ही अभिनेत्री “लक्ष्मीनारायण” या मालिकेत लक्ष्मीच्या मुख्य भूमिकेतुन अभिनय क्षेत्रात पदार्पण केलेले आहे, यात लक्ष्मी आणि अललक्ष्मी असे दोन पात्र तिने साकारले आहे. ही मालिका ओडिसी भाषेतही डब झाली आहे. त्यानंतर सोनी मराठी वरील ‘मी तुझीच रे’ या मालिकेत दिव्या, झी मराठीवरील ‘कारभारी लय भारी’ मधील पियू (प्रियंका) ह्या भूमिका तिने साकारल्या आहे. ‘बंगला’ हा कोळीगीतांचा अल्बम झी वाजवा या चैनल वर प्रसिद्ध झाला आहे.

तसेच पीएनजीच्या जाहिरातीतून अनुष्का जाहिरात क्षेत्रातही उतरली आहे. झी टॉकीज वरील ‘नाचू कीर्तनाचे रंगी’ या भक्तीरसाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ही ती करते सध्या मराठी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये ती व्यस्त आहे त्यातून वेळ काढून अनुष्का या नृत्य स्पर्धा कार्यक्रमासाठी येत आहे आपणही या कार्यक्रमास उपस्थित राहवे अशी विनंती प्राचार्य डॉ. दीपा क्षीरसागर, डॉक्टर सारिका क्षीरसागर, सोनल पाटील, अनिता शिंदे यांनी केली आहे.
