अचानक भेटीत शिक्षणाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांची घेतली परीक्षा
By MahaTimes ऑनलाइन | बीड
जिल्हा परिषद अशोकनगर शाळा आता मॉडेल स्कूल होऊ शकते यासाठी आणखी प्रयत्नांची गरज आहे. येथील सर्व शिक्षक हे शक्य करून दाखवतील आणि गोरगरीब, मागास, अल्पसंख्यक मुलांचे आशिर्वाद घेतील असा विश्वास शिक्षणाधिकारी (माध्य) नागनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा अशोकनगर बीड येथे बुधवारी माध्यमिक जि.प.बीड मा. नागनाथ शिंदे यांनी भेट देऊन सर्व वर्गाची पाहणी केली. मुलांना लिहिण्यास व वाचन करण्यास लावुन या द्वारे त्यांचा शैक्षणिक स्तराची तपासणी केली. दरम्यान उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना गणवेशात पाहून समाधान व्यक्त केले. शासकीय योजनेतून हे सर्व उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्याध्यापक व शिक्षकांचे अभिनंदन केले.
या वेळी शाळेच्यावतीने शिक्षणाधिकारी मा. नागनाथ शिंदे व गेवराई चे गट शिक्षणाधिकारी मा.गोपाळघरे यांचा मुख्याध्यापक शेख मुसा व शिक्षकांनी यथोचित सत्कार केला. यावेळी शिक्षक नितीन भोसले, विठ्ठल जायभाय, सखाराम शिंदे, फुंदे, मणियार हकीम, संगीता आनोळे, मठकरी, अफसाना शेख, शुभांगी औताने, ऊषा सोनवणे, संगीता वाघमारे, कागदे, सुरेखा चव्हाण, मनिषा काकडे, धस तसेच गांधी नगर शाळेचे श्री. कवचट, शेख हूजीर व खाडे सर उपस्थित होते.