राजकारण आणि समाजकारणाच्या माध्यमातून बीड शहरात त्यांची ओळख, पक्ष नेतृत्वाकडे निवडणुक लढविण्याची व्यक्त केली इच्छा
By MahaTimes ऑनलाइन | बीड
बीड नगर परिषदेत सभापती म्हणून असलेल्या कामाचा अनुभव, बँकेच्या माध्यमातून बीड शहरात निर्माण झालेला मोठा जनसंपर्क आणि बेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मिळविलेले १७ हजारापेक्षा अधिकचे मते या सर्व जमेच्या बाजू असल्याने भाजपकडे न.प. अध्यक्ष पदासाठी नवनाथ शिराळे यांचा अनुभवी चेहरा असून शिराळे यांनी पक्ष नेतृत्वाकडे निवडणुक लढविण्याची इच्छा देखील व्यक्त केली आहे.
बीडच्या राजकारणामध्ये नवनाथ शिराळे हे नाव बीडकरांच्या चांगल्याच परिचयाचे आहे. शिवसेनेमध्ये असताना सामान्य जनतेच्या प्रश्नावर शिराळेंनी अनेकदा आवाज उठविला, आंदोलने केली त्यामुळेच मतदारांनी नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी त्यांना दिली. ही संधी मिळाल्यानंतर त्यांच्याकडे न.प. तील सभापती पदाची जबाबदारी देखील सोपविण्यात आली होती. सभापती पदाच्या माध्यमातून सामान्य जनतेचे नगरपालिकेतील विविध कामे त्यांना करता आली.
२००१ मध्ये जनतेतून नगराध्यक्षाची निवड झाली त्यावेळी नवनाथ अण्णा शिराळे यांना शिवसेनेने नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून उमेदवारी दिली होती. त्या काळात १७ हजारापेक्षा अधिकची मते शिराळे यांना मिळाली होती. शिराळेच्या उमेदवारीमुळे त्या काळात न.प. निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली होती. आता पुन्हा शिंदे – फडणवीस सरकारने नगराध्यक्ष हे थेट जनतेतून निवडून येतील असा निर्णय घेतल्यामुळे बीड भाजपाकडे नवनाथ अण्णा शिराळे सारखा अनुभवी चेहरा आहे.
शिराळे यांनी पक्ष नेतृत्वाकडे न.प. अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्या संदर्भातील आपली इच्छा देखील व्यक्त केली आहे. राजकारण आणि समाजकारणाच्या माध्यमातून बीड शहरात त्यांची असलेली ओळख धमक कामाच्या माध्यमातून निर्माण झालेली छबी या सर्व बाबींमुळे नवनाव शिराळे यांना पक्षाने उमेदवारी दिल्यास ते चांगले उमेदवार ठरू शकतील. राज्यामध्ये झालेले सत्तांतर आणि भाजपाचा सत्तेत असलेला सहभाग या जमेच्या बाजू ठरु शकतील.