लवकरच माजी मंत्री क्षीरसागर यांच्या उपस्थितीत भव्य प्रवेश सोहळा
By MahaTimes ऑनलाइन | बीड
आ.संदीप क्षीरसागर यांच्या सोबत काम करत असताना विकास कामे पूर्ण न झाल्यामुळे आपण विकास कामांना प्राधान्य देणार्या नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली योगेश पर्व बरोबर काम करण्याचा निर्णय घेतला असून पुन्हा एकदा जोमाने काम करणार असून येणार्या काळात बीड नगर पालिका पुन्हा एकदा ताब्यात आणण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणार असल्याचे यावेळी आसाराम गायकवाड यांनी सांगितले.
बीड मतदार संघाचे आ.संदीप क्षीरसागर यांचे खंदे समर्थक आसाराम गायकवाड यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत जाहीर प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पेठ बीड भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला व आ.संदीप क्षीरसागर यांना मोठा धक्का बसला आहे.
नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर म्हणाले की, आसाराम भाऊ गायकवाड यांचा हा प्रवेश म्हणजे पुनर्रगृह प्रवेश होणार आहे. आसाराम भाऊ गायकवाड यांच्यामुळे पेठ बीड भागात ताकद वाढली आहे. पेठ बीड भागाने स्व.काकू-नानांच्या काळापासून अतिशय प्रतिकूल परिस्थितीत देखील आम्हाला मदत केली आहे. आसाराम गायकवाड यांना विरोधकांसोबत काम करत असताना वाईट अनुभव आल्यामुळेच त्यांनी योगेश पर्वला सोबत घेऊन काम करण्याचा निर्णय घेतला आहे.
डॉ. योगेश भैय्या क्षीरसागर म्हणाले की, आसाराम भाऊ गायकवाड यांच्या रूपाने पेठ बीड भागात मोठी ताकद आमच्या सोबत आली आहे. आसाराम भाऊ गायकवाड यांनी विकास कामांच्या मुद्यावर आमच्याकडे प्रवेश केला असल्याने त्यांना नक्कीच याची प्रचिती येईल. ग्रामीण भागात आणि बीड शहरात येणार्या काळात मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. काही दिवसात माजी मंत्री जयदत्त आण्णा क्षीरसागर यांच्या उपस्थितीत आसाराम भाऊ गायकवाड यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेश सोहळा होणार आहे.
यावेळी बाजार समिती सभापती दिनकरराव कदम, तालुका दूध संघाचे अध्यक्ष विलास बडगे, अरुण डाके, ऍड राजेंद्र राऊत, अमर नाईकवाडे, फारुख पटेल, बाळासाहेब गुंजाळ, सतिश पवार, प्रेम चांदणे, महेश धांडे, विकास जोगदंड, भास्करराव जाधव, किशोर पिंगळे, विलास विधाते, इकबाल शेख, बाबा खान, भैय्या मोरे, गणेश वाघमारे, रंजित बनसोडे, शुभम धूत, राणा चौव्हान, सय्यद इलियास, मुन्ना इनामदार, रवींद्र कदम, सादेक शेख यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.